नवी दिल्ली : पाच राज्यांतील काँग्रेसच्या (Congress) निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) गांधी कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहेत. पाच राज्यांतील पराभवासाठी केवळ सोनिया गांधी (Sonia Gandhi) एकट्याच नव्हे तर, राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत, असे मत मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले आहे. पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधीवर पुन्हा विश्वास दाखवल आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे देखील खर्गे म्हणाले. (Congress Leader Mallikarjun Kharge On Soniya Gandhi)
पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर रविवारी (दि.13) काँग्रेस कार्यकारिणीच्या (Congress Leader Meeting ) बैठक पार पडली. यामध्ये पक्ष मजबूत करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचे खर्गे यांनी यावेळी सांगितले. आम्ही भाजप (BJP) आणि त्यांच्या विचारसरणीशी लढू, आमची विचारधारा पुढे करू तसेच आम्हाला आशा आहे की, पुढच्या निवडणुकीत आम्ही पूर्वीपेक्षा खूप चांगली कामगिरी करू असे खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले.
'काँग्रेस संसदेत जनतेचे प्रश्न मांडणार'
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून (दि.14) सुरू झाला असून, आम्ही या चर्चेत सहभागी होऊन जनतेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडू, अशी आमची रणनीती असल्याचे खर्गे यांनी सांगितले. विशेषत: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या कशा सोडवायच्या, महागाई, बेरोजगारी, या सर्व समस्यांवर चर्चा व्हायला हवी असे खर्गे यांनी यावेळी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.