देश

३८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुवर्ण मंदिर लष्कराच्या गोळीबाराने हादरलं होतं

अचानक २ जूनच्या संध्याकाळी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी अचानक दूरदर्शनवर आल्या आणि त्यांनी देशाला उद्देशून भाषण दयायला त्यांनी सुरुवात केली. त्यात त्यांनी जर्नलसिंग भिंद्रनवाले यांना चर्चेचं आमंत्रण दिलं. पण त्यांना त्याचवेळी चर्चेला उपस्थित होता आलं नाही कारण की त्याआधीच अमृतसर शहरांतील सर्व फोन लाईन्स कापण्यात आल्या होत्या.

दिपाली सुसर

जून महिन्यातील पहिला आठवडा सर्वच शिखांसाठी अत्यंत वेदनादायक आहे. कारण याच काळात इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने पंजाबच्या अमृसर मधील सुवर्ण मंदिरात घुसून अंदाधुंद गोळीबार करुन ऑपरेशन ब्लू स्टार पूर्ण केलं होतं.

स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती आणि या प्रकरणाला हवा देण्याचं काम जर्नलसिंग भिंद्रनवाले यांनी केलं होतं असं सांगितलं जातं.

नेमकं काय होतं ब्लू स्टार ऑपरेशन ?

१९८४साली इंदिरा गांधी सरकारने पंजाबमधील वाढत्या हिंसक घटना रोखण्यासाठी "ब्लू स्टार ऑपरेशन"ची आखणी करुन सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.

ब्लू स्टार ऑपरेशन घटना क्रम...

अचानक २ जूनच्या संध्याकाळी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी अचानक दूरदर्शनवर आल्या आणि त्यांनी देशाला उद्देशून भाषण दयायला त्यांनी सुरुवात केली. त्यात त्यांनी जर्नलसिंग भिंद्रनवाले यांना चर्चेचं आमंत्रण दिलं. पण त्यांना त्याचवेळी चर्चेला उपस्थित होता आलं नाही कारण की त्याआधीच अमृतसर शहरांतील सर्व फोन लाईन्स कापण्यात आल्या होत्या.

इकडे इंदिरा गांधी दूरदर्शनवर देशाला संबोधित करत होत्या आणि तिकडे अमृतसर मध्ये मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या तुकड्या सुवर्ण मंदिराच्या दिशेनं चालल्या होत्या.

लष्कर मंदिराच्या ठिकाणी पोहोचताच लष्करानं मंदिरात लपलेल्या लोकांना बाहेर येण्यासाठी लाऊड स्पीकरवरून मोठ्या मोठ्याने विनंती केली.

विशेषतः त्या दिवशी म्हणजे २ जून १९८४ रोजी अमृतसरच्या हर मंदिर साहेब परिसरात हजारो शिख बांधव जमले होते.कारण होतं शिखाचे गुरु अर्जुन देवांचा ३ जूनला शहीद दिन होता.इकडे शिख बांधव श्रध्देची उपासना करण्यात व्यग्र अन त्याच वेळी अचानक सुवर्ण मंदिरातील वीज-पाणी कापले गेले,आंतरराष्ट्रीय मिडियाला पंजाब मधून बाहेर काढलं गेलं.आणि अमृतसर मध्ये संचारबंदी लागु करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जून 1984 च्या पहाटेलाच भारतीय सेनेनं अमृसरच्या सुवर्ण मंदिराला घेरा घालता.

या सगळ्या गोष्टी पाहुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला.आणि 4 जूनचा दिवस उजाडताच लष्कराने हवेत गोळीबार सुरु केला.

गोळीबाराच कारण हे होतं की भारतीय सेनेला कट्टरतावादी लोकांकडे असलेल्या शस्रांची चाचपनी करायची होती.नेमका अंदाज घ्यायचा होता कि शस्रसाठा किती प्रमाणात आहे.पण झालं उलटचं कट्टरतावादी लोकांनी गोळीबाराला गोळीबारानेच सडेतोड उत्तर दिले.आणि मग वाद आणखी चिघळला भारतीय सेनेने प्रतिउत्तर देण्याचे ठरवले आणि 5 जूनच्या रात्री कट्टरतावादी आणि भारतीय लष्कर यांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.

या गोळीबाराच्या खेळात 6 जुनची पहाट उजाडली.

आणि लष्करानं रणगाडे आत घुसवले आणि अंतिम प्रतिकाराला सुरूवात झाली. भारतीय लष्करांचे सैनिक हरमंदिर साहिबच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचलं होतं. गोळीबार सुरुच राहिला. आणि शेवटी कट्टरतावादी संघटनेच नेतृत्व करणाऱ्या भिंडरावालाचा मृतदेह सैन्याच्या हाती लागला.अन मग 7 जून1984 रोजी भारतीय लष्करांने अमृतसरच्या मंदिरातील ही कारवाई संपवली.

अस हे रक्तरंजित ऑपरेशन ब्लू स्टार 1जून ते 10जून पर्यंत चाललतं यात असंख्य निशस्त्र लोक मारले गेले.

तुमच्या माझ्या सारख्याच्या मनात एक प्रश्न येतोच कि हे ऑपरेशन ब्लू स्टार कुणी आखलं असेल ?

सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईच्या आखणीची जबाबदारी मेजर जनरल कुलदीप बुलबुल ब्रार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण प्रत्यक्ष मोहिमेवर मात्र मेजर जनरल सुंदरजी होते .आणि त्यावेळी भारतीय लष्कराचं प्रमुखपद जनरल अरुण वैद्य या मराठी माणसाकडे होतं.

ऑपरेशन ब्लू स्टारचे परिणाम

ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची शीख कट्टरतावाद्यांनी हत्या केली.

त्या पहिली हत्या 1984 केली ती होती भारताच्या पंतप्रधान असलेल्याइंदिरा गांधींची आणि दुसरी हत्या केली1986 मध्ये जनरल वैद्य यांची या दोन्ही व्यक्तीवर शिख लोकांचा खुप मोठा रोष होता.

ऑपरेशन ब्लू मध्ये किती लोक मारले गेले?

ऑपरेशन ब्लू मध्ये भारतीय लष्कराचे एकुन 83 सैनिक मारले गेले आणि 248 सैनिक जखमी झाले. याशिवाय 492 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,592 लोकांना अटक झाली.

ऑपरेशन ब्लू या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या.

हे ऑपरेशन म्हणजे भारतीय सैन्याचा विजय होता, पण राजकीयदृष्ट्या एक मोठा पराभव होता.

या ऑपरेशनची वेळ, तयारी, अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधीना आपला जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT