opposition meeting 
देश

Opposition Meet: बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत होणार 'नवी आघाडी'; युपीएचं नाव बदलणार?

भाजपविरोधी पक्षांची दोन दिवसीय दुसरी बैठक बंगळुरु इथं आजपासून सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : भाजपविरोधी पक्षांची दोन दिवसीय दुसरी बैठक बंगळुरु इथं आजपासून सुरु झाली आहे. या बैठकीत नवी आघाडी होण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वीच्या काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचं नाव बदलण्यात येऊ शकतं, अशी चर्चा आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अन् आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Opposition Meet new alliance will be held in opposition meeting in Bangalore UPA name changed)

अनेक समविचारी पक्षांची आघाडी असलेल्या काँग्रेसप्रणित युपीए दोन वेळेला सत्तेत होती. सन २००४ ते २०१४ या सलग १० वर्षांच्या कालावधीत या आघाडीची देशात सत्ता होती. या युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. त्यामुळं सोनिया गांधी यांचा युपीएला सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका राहिली होती. (Latest Marathi News)

काँग्रेसची भूमिका काय?

पण आता गेल्या ९ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या सरकारची सत्ता आहे. या एनडीएला आणि पर्यायानं भाजपला रोखण्यासाठी आता विरोधकांची नवी आघाडी तयार झाली आहे.

पण या आघाडीमध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष असला तरी या आघाडीचं नाव बदलून नवं नाव ठेवण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, "आम्ही एकटे याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, बैठकीत सर्वांनुमते यावर निर्णय घेतला जाईल" (Marathi Tajya Batmya)

बैठकीतील महत्वाचा अजेंडा काय?

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवावा लागणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी राज्यस्तरीय जागा वाटपाचा फॉर्म्युलाही या बैठकीत ठरवला जाणार आहे.

त्याचबरोबर ईव्हीएम तसेच निवडणूक आयोगामध्ये काय बदल करायला हवेत या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय प्रचार कार्यक्रम, आंदोलनं अशा अनेक मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. या चर्चेबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT