opposition meeting in patna leader of opposition cm reached by chartered-plane in bihar marathi news  
देश

Patna Meeting: पाटण्यात चार्टर्ड विमानांची गर्दी! राहुल गांधींसह ५ मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्र्याचा लक्झरी प्रवास

रोहित कणसे

बिहारची राजधानी पाटणा हे अचानक देशाच्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आलं होतं. आचानक पाटणा शहरावर अनेक विमान घोंगवू लागली, याआधी इतकी विमान एकाच दिवसी कदाचितच शहरवासीयांनी पाहिली असतील. यासाठी निमीत्त होतं भाजप सरकारविरोधात पाटण्यात राजकीय विरोधीपक्षांची बैठक. गुरूवारी झालेल्या या बैठकील देशभरातून नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामुळे सामान्य नागरिकांना आकाशात छोटी छोटी विमाने पाहायला मिळाली.

या बैठकीआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेच चार्टर्ड प्लेन ने येत असल्याची माहिती होती. मात्र याआधी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी हे चार्डर्ड प्लेनने पाटण्यात आल्या होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील चार्डर्ड प्लेनने दाखल झाले. म्हणजेच बैठकीच्या एक दिवस आधी छार मुख्यमंत्री चार्डर्ड प्लेनने आले होते.

शुक्रवारी झालेल्या विरोधकांच्या या बैठकीसाठी पाटणा विमानतळावर चार्टर्ड प्लेन पार्किंग फुल्ल झाली होती. झारखंडचे सीएम हेमंत सोरेन चार्टर्ड प्लेनने आले त्यानंतर दुसऱ्या चार्टर्ड प्लेनने शरद पवार राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्यांसोबत दाखल झाले.

शुक्रवारी युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव देखील चार्टर्ड विमानाने दाखल झाले होते. यानंतर सकाळी १० वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे एका चार्टर विमानातून उतरले. बैठकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात शेवटी पोहचसे ते देखील चार्टर्ड प्लेननेच पाटण्यात दाखल झाले.

जम्मू काश्मिरचे दोन माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती हे शेड्यूल फ्लाइटने प्रवास करून पाटण्याला पोहचले आणि परत देखील गेले. इनके आलावा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) के. डी. राजा आणि भारतीय कम्युनस्ट पार्टी(मार्क्सवादी-लेनिनवादी) चे दिपांकर भट्टाचार्य देखील प्रवासी विमानाना आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा)चे सीताराम येचुरी येताना विमानाने आले मात्र परत जाताना ते देखील चार्टर्ड प्लेनने गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT