कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणात केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी आज राज्यसभेत विरोधकांनी गोंधळा घातला. विरोधकांच्या गोंधळामुळे उद्विग्न झालेले राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी अखेर सभागृह सोडले.
राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) गटनेते डेरेक ओब्रायन यांनी विनेश फोगाटचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी. या मागणीला टीएमसीच्या इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. ‘शरम करो, शरम करो,’ अशा घोषणा टीएमसीचे सदस्य देऊ लागले. यावेळी सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा टीएमसीच्या सदस्यांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केल्यानंतर सभागृहातील गोंधळ वाढला.
धनकड हे ओब्रायन यांच्या वर्तणुकीवर नाराज झाले. अध्यक्षांच्या खुर्चीकडे पाहून तुम्ही ‘शरम करो, शरम करो,’ असे म्हणत आहात. हा या या पदाचा अपमान आहे. सभागृहात अराजक निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. देशाने आणिबाणी झेलली आहे. पुन्हा देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. हा राजकारणाचा विषय नाही. फोगाटचे पदक हुकल्याने सारा देश दुःखात आहे. असे म्हणत त्यांनी डेरेक ओब्रायन यांना तुम्हाला सभागृहाच्या बाहेर काढेन, असा इशारा दिला. विरोधकांच्या वर्तणुकीमुळे आपण दुःखी झाल्याचे सांगत धनकड उठून सभागृहातून निघून गेले.
विरोधकांची वर्तणूक निषेधार्हः नड्डा
विरोधकांच्या गोंधळात राज्यसभेचे अध्यक्ष धनकड यांनी खासदार कार्तिकेय शर्मा यांना बोलण्याची परवानगी दिली. परंतु गोंधळात काहीच ऐकू येत नव्हते. यानंतर सभागृहाचे नेते जे.पी.नड्डा यांनी, ‘‘टीएमसी व काँग्रेसच्या सदस्यांची वर्तणूक नक्कीच निषेधार्ह आहे. अध्यक्षांच्या खुर्चीचा या तऱ्हेने अपमान करणे योग्य नाही. याची दखल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी,’’ असे सांगत धनकड यांच्या मताशी सहमत असल्याचे नड्डा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.