MP Asaduddin Owaisi e sakal
देश

UCC: "मुस्लिमांना धडा शिकवण्याच्या नादात देशाचं होणार नुकसान"; ओवैसी पहिल्यांदाच बोलले

देशात आता समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीवरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात आता समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीवरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. याला विविध राजकीय पक्षांचं समर्थन आहे तर अनेकांनी याला विरोधही केला आहे. पण मुस्लिमांचा यातला विषय महत्वाचा असल्यानं यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या कायद्यामुळं देशाचं नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Owaisi first time spoke on UCC says Pretending to teach Muslims a lesson but big loss of country)

समान नागरी कायद्यावर आयोजित एका चर्चासत्रात बोलताना ओवैसी म्हणाले, शरियत संदर्भात कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही. समान नागरी कायद्यातून केवळ मुस्लिमांना धडा शिकवत असल्याचं दाखवलं जात आहे. समान नागरी कायद्यातून मुस्लिमांच्या नावावर हिंदूंचंच नुकसान केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

"समान नागरी कायदा जर देशात अस्तित्वात आला तर हिंदू हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ मधील कलम ५ रद्द आणि कलम ६ रद्द होईल तसेच प्रॉपर्टी अॅक्ट देखील निघून जाईल. हिंदू एकत्र कुटुंब कायद्यानुसार इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते. (Marathi Tajya Batmya)

२०१५ मधील इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार अशा हिंदू कुटुंबांना ६५ हजार कोटींची कर मिळाली आहे. मग समान नागरी कायदा आला तर हे राहणार नाही. हे हिंदू बांधवांना समजून घ्यावं लागेल," असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT