Vijender Yadav Lalu Yadav esakal
देश

Bihar : भररस्त्यात RJD नेत्याची गोळ्या झाडून हत्या; लालू-तेजस्वींच्या निकटवर्तीयाचा जागीच मृत्यू

रोहतास जिल्ह्यात गुन्हेगारांनी मोठी घटना घडवलीय.

सकाळ डिजिटल टीम

रोहतास जिल्ह्यात गुन्हेगारांनी मोठी घटना घडवलीय.

रोहतास : बिहारमधील रोहतास जिल्ह्यात (Rohtas District) गुन्हेगारांनी मोठी घटना घडवलीय. जिल्ह्यातील करगहर इथं PACS चे अध्यक्ष विजेंदर यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. विजेंदर यादव (Vijender Yadav) हे करगहरचे प्रमुख असून सध्या ते PACS चे अध्यक्ष देखील आहेत.

गेल्या तीन दशकांपासून ते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि आरजेडीशी संबंधित होते, तसेच तेजस्वी यादव यांच्या जवळचे मानले जात होते. आज (रविवार) सकाळी ते काही मजुरांसह त्यांच्या भातशेतीत गेले असता दुचाकीवरून आलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांची माहिती जाणून घेतली आणि काही वैयक्तिक बोलण्याच्या बहाण्यानं शेताशेजारील रस्त्यावर बोलावलं. थोडा वेळ बोलल्यानंतर त्यांच्या मानेवर व डोक्यात मागून गोळी झाडली. त्यामुळं विजेंदर यादव यांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीवरून गुन्हेगार फरार

शेतात काम करणाऱ्या मजुरांना गोळीबाराचा आवाज आल्याने ते रस्त्यावर धावत आले. तोपर्यंत दुचाकीस्वार शस्त्रं उगारुन तेथून पळून गेले. यात आरजेडी नेत्याचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी काही वेळानं करगहर पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT