Pak Rangers resorted to unprovoked firing towards BSF troops in Arnia Sector 
देश

Jammu Kashmir News: पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, BSF चे दोन जवान जखमी!

Sandip Kapde

Jammu Kashmir News:   पाकिस्तानने पुन्हा सीमेवर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ते 10 राउंड गोळीबार करण्यात आला. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान सैन्यादरम्यान झालेल्या युद्धविराम करारानंतर युद्धविराम उल्लंघनाची ही पहिली मोठी घटना आहे.

काल पाक रेंजर्सनी बीएसएफच्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. ज्याला अरनिया  सेक्टरमध्ये सतर्क असलेल्या बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन बीएसएफ जवानांना गोळी लागल्याने त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे, अशी माहिती बीएसएफ (जम्मू) कडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अरनिया सेक्टरमध्ये सीमेवर एका खांबावर बीएसएफचे जवान काही काम करत होते. एक शिपाई खांबावर चढत होता तर दुसरा शिपाई खाली उभा होता. त्यानंतर अचानक पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. यादरम्यान खांबावर चढणाऱ्या जवानाला गोळी लागली. प्रत्युत्तरादाखल खाली उभ्या असलेल्या सैनिकानेही गोळीबार केला.

सीमेवर बराच काळ शांतता होती पण आता अचानक पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत माहिती दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT