Pakistan News Esakal
देश

Pakistan News: भारताच्या शत्रूची पाकिस्तानमध्ये हत्या; काश्मीरमध्ये हल्ला करणाऱ्या सुत्रधाराचं कापलं शीर

Pakistan News: काश्मीरमधील हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक दहशतवादी गेल्या नोव्हेंबरमध्ये मारला गेला होता. लष्कर कमांडर ख्वाजा शाहिद उर्फ ​​मियाँ मुजाहिद हा मुख्य सूत्रधार होता. पीओकेमध्ये नियंत्रण रेषेजवळ त्याचे शीर कापल्याचे आढळले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पाकिस्तानातील पंजाबमध्ये सोमवारी रात्री उशिरा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी लष्कराचा निवृत्त ब्रिगेडियर आणि आयएसआयचा महत्त्वाचा व्यक्ती आमिर हमजा यांची हत्या केली. हमजा भारताविरुद्ध आयएसआयच्या नेतृत्वाखालील कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती होती. जम्मू-काश्मीरमधील सुंजवान आर्मी कॅम्पवर 2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते. १२ पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते.

याच हल्ल्यात सामील असलेला आणखी एक दहशतवादी गेल्या नोव्हेंबरमध्ये मारला गेला होता. लष्कर कमांडर ख्वाजा शाहिद उर्फ ​​मियाँ मुजाहिद हा मुख्य सूत्रधार होता. पीओकेमध्ये नियंत्रण रेषेजवळ त्याचे शीर कापलेले आढळले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमजाची पत्नी आणि मुलगीही त्याच्यासोबत कारमध्ये होती. त्यांना दुखापत झाली आहे. ठार झालेल्या आयएसआय एजंटचे कोणाशीही वैयक्तिक वैर नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. हे टार्गेट किलिंग असल्याचं पाकिस्तानी पोलिसांनी म्हटलं आहे.

पंजाबमधील झेलम जिल्ह्यात हा हल्ला झाला. मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञातांनी हमजाच्या कारवर हल्ला केला. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार कार झेलममधील लीला इंटरचेंजपर्यंत पोहोचली होती तेव्हा दोन बाईकवरून आलेल्या चार लोकांनी तिला दोन्ही बाजूंनी घेरले. झेलम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागे बसलेल्या लोकांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने सांगितले की, हमजाचा भाऊ अयुब हा हल्ल्याचा साक्षीदार होता. हल्ल्याच्या वेळी तो मोटारसायकलवरून आपल्या भावाच्या कारसोबत जात होता. तक्रारदार असूनही त्याची पोलिस चौकशी सुरू आहे. "आम्ही या हत्येचा तपास करत आहोत. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि हल्ल्याचा तपास सुरू आहे," असे पाकिस्तान पोलिसांनी स्थानिक माध्यमांना सांगितले.

आयएसआय प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित पाकिस्तानी दहशतवादी भारतात सातत्याने मारले जात आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, आयएसआयचा एक प्रमुख कार्यकर्ता आणि कडक सुरक्षारक्षक आमिर सरफराजची लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अदनान अहमद उर्फ ​​अबू हंझाला याचीही अज्ञातांनी डिसेंबरमध्ये कराचीमध्ये हत्या केली होती.जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहिद लतीफ हा 2016 मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या फिदायन पथकाचा मुख्य ऑपरेटर होता. ऑक्टोबरमध्ये सियालकोटमधील एका मशिदीत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT