Pakistan family living in India under Sharma identity 
देश

Pakistani Living in India : 'शर्मा नव्हे सिद्दीकी', कित्येक वर्षांपासून भारतात राहत होतं पाकिस्तानी कुटुंब; असा झाला भांडाफोड

रोहित कणसे

बंगळुरू येथे रविवारी रात्री शर्मा कुटुंब म्हणून राहात असलेल्या चार पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब २०१८ पासून भारतात वास्तव्य करत होते. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करत या कुटुंबाला अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार पकिस्तानी व्यक्तीची बायको ही बांगलादेशची आहे आणि याआधी ते ढाका येथे राहात होते जेथे त्यांचे लग्न झाले होते.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितले की आरोपी ४८ वर्षीय राशिद अली सिद्दीकी, ३८ वर्षीय आएशा आणि महिलेचे आई-वडिल ७८ वर्षीय हनीफ मोहम्मद आणि ६१ वर्षीय रुबीना राजापुरा गावात राहात होते. येथे कुटुंब शंकर शर्मा, आशा राणी, रामबाबू शर्मा आणि राणी शर्मा या नावाने राहात होते.

जेव्हा रविवारी पोलिस अटक करण्यासाठी पोहचले तेव्हा सिद्दीकी कुटुंबाची बांधाबांध सुरू हती. चोकशीत सिद्दीकी यांनी स्वतःचं नाव शर्मा सांगितलं आणि ते २०१८ पासून बंगळुरूमध्ये राहात असल्याचे देखील सांगितले. तपासादरम्यान या कुटुंबाने भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड देखील दाखवले. रिपोर्टनुसार जेव्हा पोलिस घरी पोहतले तेव्हा त्यांना मेहदी फाउंडेशन इंटरनॅशनल जश्न-ए-यूनुस असे भिंतीवर लिहील्याले आढळून आले. सोबतच घरात काही मौलविंचे फोटो देखील आढळून आले.

चौकशीमध्ये सिद्दीकी उर्फ शंकर शर्मा याने मान्य केले की, तो पाकिस्तानामधील लियाकताबाद येथील रहिवासी आहे. तर त्याची पत्नी आणि त्याचे कुटुंब लाहौर येथील आहे. त्याने सांगितले की आएशा सोबत २०११ मध्ये एका ऑनलाइन समारंभात त्याचे लग्न झाले होते. तेव्हा ती बांगलादेशात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. सिद्दीकीने सांगितले की आपल्याच देशातील त्रासाला कंटाळून त्याला पाकिस्तान सोडून बांगलादेशात जावे लागले.

भारतात कसे पोहचले?

एफआयआरमध्ये सांगण्यात आले आहे की, सिद्दीकी यांने बांगलादेशात स्थलांतर केले, तेथे तो उपदेशक बनला. २०१४ मध्ये सिद्दीकी याला बांगलादेशात लक्ष्य करण्यात येऊ लागले, त्यानंतर तो भारतातील परवेज नावाच्या मेहदी फाऊंडेशनच्या सदस्याच्या सपर्कात आला आणि अवैध पद्धतीने भारतात स्थलांतरित झाला. रिपोर्टनुसार सिद्दीकी त्याची पत्नी आणि तिच्या आई वडिल जैनबी नूर आणि मोह्हमद यासीन बांगलादेशहून पश्चिम बंगालच्या मालदा मार्गे पोहचला होता. येथे काही एजंट्सनी त्यांची मदत केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, हे कुटुंब सुरूवातीला काही दिवस दिल्लीत देखील वास्तव्यास होते आणि त्यांनी बनावट आधार कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हींग लायसेन्स देखील मिळवले. २०१८ मध्ये नेपाळ दौऱ्यावेळी सिद्दीकी याची भेट बंगळुरू येथील वाशिम आणि अल्ताफ यांच्याशी झाली त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

अल्ताफने त्याला घरभाडे पुरवले आणि मेहदी फाउंडेशनने त्याला इतर गोष्टींसाठी पैसे दिले. सिद्दीकी हा गॅरेजमध्ये ऑइल सप्लाय करणे तसेच खाद्यपदार्थ विकण्याचे काम करत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हृदयद्रावक ! पिकनिकला निघालेल्या शाळेच्या बसने अचानक घेतला पेट, २५ मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती

iPhone मागवला, पैसे देण्याऐवजी डिलिव्हरी बॉयचा केला खून; मृतदेहाची 'अशी' लावली विल्हेवाट

WTC 2023-25 Points Table: टीम इंडियाने सिंहासन केलं भक्कम, पण आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचे

Suyash Tilak: "पैसे न देणाऱ्यांचं..." मराठी अभिनेत्याला मिळाले नाहीत कामाचे पैसे; पोस्ट करत व्यक्त केला संताप

Latest Maharashtra News Updates : यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीला

SCROLL FOR NEXT