Narendra Modi esakal
देश

पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्यावर पाकिस्तानने घेतला आक्षेप; म्हणाले...

चिनाब नदीवर उभारण्यात येणाऱ्या दोन प्रकल्पांची पायाभरणी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल काश्मीर दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी चिनाब नदीवरच्या काही हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पांची पायाभरणी केली. मात्र पाकिस्तानने याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. कराराचा भंग असल्याचा आरोप करत पाकिस्तानने आपला आक्षेप नोंदवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी काश्मीरला भेट देत सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या दौऱ्यादरम्यान, मोदी यांनी रॅटल अँड क्वार या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प चिनाब नदीकिरानारी किश्तवर इथं उभारण्यात येत आहे. हा ५,३०० कोटींचा प्रकल्प आहे, तर त्याच नदीवर उभारण्यात येणारा क्वार हा प्रकल्प ४,५०० कोटींचा आहे.

या प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमावर पाकिस्तानने टीका केली आहे. रॅटल हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या बांधणीसंदर्भात पाकिस्तानसोबत वाद सुरू आहे. तर क्वार प्रकल्पासाठी भारताने इंडस वॉटर कराराचं पालन केलेलं नाही आणि पाकिस्तानला माहिती कळवलेली नाही. अशा दोन प्रकल्पांची पायाभरणी भारतीय पंतप्रधानांनी करणं हे इंडस वॉटर कराराचं उल्लंघन आहे, असं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

१९६० सालच्या इंडस वॉटर करारानुसार, सतलज, बिज आणि रावी अशा पूर्वेकडच्या नद्यांचं पाणी भारताला दिलेलं आहे, तर इंडस, झेलम आणि चिनाब या पाश्चिमात्य नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत'

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

देशमुखांचं घर रिकामं होतंय... रुपाली भोसलेने शेअर केला व्हिडिओ; कुठे होत होतं 'आई कुठे...'चं शूटिंग

Kantara 2 Teaser Release: 'कांतारा २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; रिषभ शेट्टीचा लूक पाहून अंगावर येईल काटा

SCROLL FOR NEXT