Pakistan VS China : पाकिस्तानची परिस्थिती कशी चालली आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही, आता तिथली परिस्थिती अशी आहे की तिथल्या लोकांना स्वस्तातले स्मार्टफोनही विकत घेता येत नाहीत . चीनची न्यूज एजन्सी शिन्हुआच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. एका वर्षात पाकिस्तानमधील मोबाईल फोनची आयात ६९.१ टक्क्यांनी कमी झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याचा अर्थ तिथल्या लोकांकडे स्वस्त फोन खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत , त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की पाकिस्तानातील लोकांना जुने हँडसेट वापरणे भाग पडत आहे.
मोबाईल टॉवरही ठप्प झाले
पाकिस्तान हा देश टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मागे आहे. गंमत म्हणजे या देशात स्मार्टफोन तयार होत नाहीत, तर ते मोबाइल फोनसाठी चीन आणि इतर देशांवर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोबाईल फोनची आयात तर कमी झाली आहेच पण आता तर पाकिस्तानात मोबाईल टॉवरही ठप्प झाले आहेत.
मोबाईल टॉवर रखडल्याने जुने फोन असलेल्यांनाही इंटरनेट, मेसेजिंग, कॉलिंग नीट करता येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाकिस्तानातील परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात असे घडण्याची शक्यता आहे की तिथे स्मार्टफोन हे फक्त लहान मुलांसाठी खेळण्यासारखेच राहतील.मोबाईल टॉवर न चालण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यावर हे सांगण्यात आले की पाकिस्तानात असे अनेक भाग आहेत जिथे ४८ तास वीज नसते. वीज नसल्यामुळे टॉवर बंद रहात आहेत.
स्मार्टफोन आयातीत 66% घट
PBS म्हणजेच पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सची आकडेवारी दर्शवते की जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत, $362.86 दशलक्ष किमतीचे स्मार्टफोन पाकिस्तानमध्ये आयात केले गेले. गेले आर्थिक वर्ष म्हणजेच 2021 मध्ये याच कालावधीत, पाकिस्तानमध्ये $1090 दशलक्ष किमतीचे मोबाइल फोन आयात केले गेले. हा आकडा परिस्थिती स्पष्ट करतो की पाकिस्तानमधील स्मार्टफोन आयातीत 66.73 टक्के घट नोंदवली गेली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.