Cylinder Explosion Haryana Panipat esakal
देश

Cylinder Explosion : सिलिंडरच्या स्फोटात आख्ख कुटुंब जळालं; 4 मुलांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू

आग इतकी भीषण होती की, घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

सकाळ डिजिटल टीम

हरियाणातील पानिपतमध्ये (Haryana Panipat) एक भीषण दुर्घटना घडलीये. इथं सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळं पत्नी आणि मुलांसह 6 जण होरपळले आहेत. पानिपतच्या बिचपडी गावात सकाळी सात वाजता हा अपघात झाला. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

वास्तविक, हरियाणाच्या पानिपतमधील एका गावात सकाळी सात वाजता सिलेंडरचा (Cylinder Explosion) स्फोट झाला, त्यामुळं घराला आग लागली. आग इतकी भीषण होती की, घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या अपघातात संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं असून 4 मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. अब्दुल करीम (50), त्यांची पत्नी अफरोजा (46), मोठी मुलगी इशरत खातून (17), रेश्मा (16), अब्दुल शकूर (10) आणि अफान (7) अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, अपघातात बळी पडलेलं कुटुंब मूळचं पश्चिम बंगालचं आहे. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT