फाइल फोटो 
देश

Crime News : निष्ठूरतेचा कळस! खायला घेऊन येतो सांगून गेलेले माय-बाप चार लेकरांना सोडून गायब

सकाळ डिजिटल टीम

चार लहान चिमुरड्यांना सोडून आई-वडिल पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात दोन मुले आणि दोन मुलीं असे पोटच्या चार अपत्यांना टाकून आई-बाप गायब झाले आहेत. ही चिमुरडी लेकरं माता-पित्यांची वाट पाहत बसली. पण ते दोघे काही परत आले नाहीत. या लेकरांनी मात्र रडून वाईट अवस्था करून घेतली. या प्रकाराने हळहळ व्यक्त होत असून या चार मुलांच्या पालकांचा शोध इंदौर पोलीस घेत आहेत.

हा प्रकार मध्यप्रदेश मधील इंदौरच्या शासकीय महाराजा यशवंत रुग्णालयासमोर चार मुलं रडताना आढळले. या चार लेकरांचे वय दोन ते आठ वर्षांच्या मध्ये आहे. संयोगितागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी तहजीब काजी यांनी सांगीतले की, मुलांनी सांगितलं की त्यांचे आई-वडिल त्यांना तेथे सोडून गेले. मुलांना त्या जागेबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यांचे पालक परत आले नाहीत म्हणून मुलं रडत बसली होती.

मुलांची चौकशी केल्यानंतर ही मुलं बडवानी जिल्ह्यातील असल्याचे पोलीसांच्या लक्षात आलं. मुलांचे आई-वडिल त्यांना खायला काहीतरी घेऊन येतो असं सांगून तेथे सोडून गेले. मुलं बराच वेळ आई-वडीलांची वाट पाहत राहिले, पण ते परत आले नाहीत. पोलीसांनी आता या मुलांना एका एनजीओला सोपवले आहे.

पोलीसांनी सांगितलं की त्यांना लहान मुलांसाठी काम करणारी एनजीओ चाइल्डलाइन मध्ये पाठवण्यात आले आहे. या चार लहान मुलांमध्ये चार आणि दोन वर्षांची मुले आणि सहा तसेच आठ वर्षांच्या दोन मुली आहेत. आई-वडिल सोडून गेल्याने मुलांचे रडणे सुरूच आहे. दरम्यान पोलीस या मुलांच्या माता-पित्याचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT