नवी दिल्ली : संसदेत घुसखोरी केल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पटियाळा हाउस न्यायालयानं सात दिवसांची कोठडी सुनावली. सागर शर्मा, डी. मनोरंजन, अमोल शिंदे आणि नीलम आझाद अशी चार आरोपींची नावे आहेत. चौघांना पंधरा दिवसांची कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं केली होती.
मात्र, न्यायालयाने आरोपींना आठवडाभराची कोठडी सुनावली. मनोरंजन आणि सागर शर्मा यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उडी मारत ‘स्मोक कँडल’ द्वारे रंगीत वायू सोडला होता. संसदेबाहेरील परिवहन भवनसमोर नीलम आणि अमोल शिंदे यांनी घोषणाबाजी करत अशाच प्रकारचा वायू सोडला होता. (Parliament Security Breach seven day police custody for accused mastermind name in front)
ललित झा हाच सूत्रधार
संसद भवन परिसरात येण्यापूर्वी हे लोक गुरुग्राममध्ये थांबले होते. या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा नावाचा इसम असून तो अद्याप फरार आहे. संसदेतील घुसखोरीमागे आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे. शिवाय दहशतवादी संघटना यामागे आहेत का? याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोपींना पंधरा दिवसांची कोठडी दिली जावी, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. संसदेत शिरून हल्ला करण्याचा कट नियोजनपूर्वक आखण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी हेच लक्ष्य
आरोपींकडून जी पत्रके जप्त करण्यात आली आहेत, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्ष्य असल्याचे म्हटले होते, असेही पोलिसांकडून युक्तिवादावेळी सांगण्यात आले. सुनावणीवेळी आरोपींकडून एकही वकील हजर नव्हता. आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे, घुसखोरी, दंगल होईल असे कृत्य करणे, सरकारी सेवेत बाधा आणणे यासह गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) वेगवेगळी कलमे लावण्यात आली आहेत.
१८ महिन्यांपासून शिजत होता कट
या हल्ल्याची तयारी सुमारे १८ महिन्यांपासून सुरू असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हे हल्लेखोर विविध राज्यांतील असून ‘भगतसिंग फॅन क्लब’ या समाजमाध्यमवरील एका समूहाद्वारे परस्परांच्या संपर्कात आले आहेत.
या हल्ल्याच्या तयारीसाठी पहिली बैठक म्हैसूर येथे १८ महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यामध्ये चंडीगड येथे दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये हल्ल्याचा कट आखण्यात आला. त्यानंतर आरोपी मनोरंजन याने संसदेत जाऊन पाहणी केली होती, असे पोलिस तपासातून उघड झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.