Parliamentary Session sakal
देश

Parliamentary Session : संसदेचे आजपासून अधिवेशन;‘नीट’च्या मुद्द्यांवरून विरोधकांकडून कोंडी शक्य

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात होत आहे. नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात होत आहे. नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे.त्यानंतर २६ तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल तर २७ तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आहे. अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन जुलै रोजी लोकसभेत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत.

अठराव्या लोकसभेचे हे अधिवेशन विशेष स्वरूपाचे असेल. मात्र तरीही ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमिततेसह अन्य मुद्द्यांवरून संसदेत सरकारची कोंडी करण्याची विरोधी पक्षांची रणनीती आहे. नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली आहे. नियमित अध्यक्षांची निवड होईपर्यंत महताब यांना काँग्रेसचे के. सुनील, द्रमुकचे टी. आर. बालू, भाजपचे राधामोहन सिंह, फग्गनसिंह कुलस्ते आणि तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय हे मदत करतील.

लोकसभा अध्यक्षपदाची धुरा भाजपच्या खासदाराकडे तर उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील(एनडीए) घटक पक्षाच्या खासदाराकडे दिली जाण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपद सहसा विरोधी पक्षाकडे दिले जाते. मात्र अध्यक्षपदासाठी भाजपने आग्रह धरला असल्याने उपाध्यक्ष पदावर एनडीएच्या घटक पक्षाला समाधान मानावे लागू शकते.

अशा स्थितीत विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे सतराव्या लोकसभेत सत्ताधारी भाजपने उपाध्यक्षपदी कोणाचीही नियुक्ती केली नव्हती. भाजपला यावेळी स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडता आलेला नाही, त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT