देश

Video : नोएडामध्ये मोठा अपघात; भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

घटनास्थळी मदत आणि बचवकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Wall Collapsed In Noida Sector 21 : नोएडाच्या सेक्टर 21 मध्ये बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत भिंतीखाली काही लोक अडकल्याचीदेखील भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी मदत आणि बचवकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जल वायू विहारमध्ये पॉवर हाऊससमोर ही भिंत पडली असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डीएम सुहास एलवाय यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमाभिंतीच्या नाल्याच्या दुरुस्तीदरम्यान सीमाभिंत सुमारे 200 मीटर खाली पडल्याने हा अपघात झाला आहे. घटनेवेळी या ठिकाणी एकूण 12 मजूर काम करत होते. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. भिंतीलगत नाली बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत पडल्याने हा अपघात झाला. सध्या 3 जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूल करण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहेत का? याचा शोध सुरू आहे.

नोएडाचे डीएम सुहास एलवाय यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, नोएडा सेक्टर 21 मधील जलवायू विहारजवळ ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिले होते. यावेळी मजूर विटा काढत असताना भिंत कोसळून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात दोन आणि कैलास रुग्णालयात दोन अशा एकूण 4 मृत्यूची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT