Pasang Dawa Sherpa esakal
देश

Pasang Dawa Sherpa : माऊंट एव्हरेस्ट 26 वेळा सर करणारा 46 वर्षीय नेपाळी शेर्पा

46 वर्षीय पासांग दावा शेर्पा एक नेपाळी शेर्पा

सकाळ डिजिटल टीम

Pasang Dawa Sherpa : 46 वर्षीय पासांग दावा शेर्पा एक नेपाळी शेर्पा आहेत. त्यांनी रविवारी 26 व्यांदा एव्हरेस्टवर सर करून इतिहास रचलाय. पासंग यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा 8,849 मीटर उंच एव्हरेस्टवर चढाई केली होती. यानंतर जवळजवळ दरवर्षी ते जगातील सर्वोच्च शिखरावर जातात आणि तो सर करतात.

आयुष्याच्या या टप्प्यावरही, त्यांचा उत्साह आणि उत्कटता लोकांना प्रेरित करते. ते म्हणतात की, वय हा एक आकडा आहे त्यापेक्षा काही नाही. एव्हरेस्ट विजेत्यांच्या नोंदी पाहिल्या तर लक्षात येईल की शेर्पा यामध्ये तज्ञ आहेत. पण शेर्पा कोण आहेत आणि ते जगातील सर्वोच्च शिखर गाठून विक्रम कसा करतात.

शेर्पा कोण आहेत?

शेर्पा हा एक खास समुदाय आहे जो हिमालयातील बर्फाळ प्रदेशात राहतो. ते विशेषतः नेपाळ आणि तिबेटच्या हिमालयीन प्रदेशात राहतात. ते गिर्यारोहकांना रस्ता दाखवून मदत करण्याचे काम करतात. हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. आत्तापर्यंत अनेक शेर्पांनी एव्हरेस्ट सर करून विक्रम केले आहेत.

शेर्पा विशेषतः उंचावर चढण्यासाठी ओळखले जातात. देशी-विदेशी पर्यटकांना मदत करणे हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. हिमालयन डेटाबेसच्या अहवालानुसार, सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग यांनी 1953 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती.

जगातील सर्वात उंच शिखर सर करणे सामान्य माणसाला अवघड आहे, पण हे शेर्पा तिथे इतिहास कसा रचतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जगातील सर्वोच्च शिखर गाठण्याच्या प्रवासातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. सीएनएनच्या वृत्तानुसार, येथे पोहोचणारे केवळ 6 टक्के लोक असे आहेत ज्यांना स्वतंत्रपणे ऑक्सिजन देण्याची गरज नाही.

जसजसे गिर्यारोहक उंचीवर पोहोचतात तसतसे उंचीवर श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होतो. पण शेर्पांच्या बाबतीत असे होत नाही. शतकानुशतके अशा ठिकाणी राहिल्यामुळे त्यांचे शरीर उंचावर चढून जाण्यात तरबेज झालं आहे. जनुकीयदृष्ट्या त्यांचे शरीर यासाठी अनुकूल झाले आहे.

2013 मध्ये 180 गिर्यारोहकांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये मैदानी भागातील 116 गिर्यारोहक आणि 64 शेर्पा यांचा समावेश होता. त्यांना एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पाठवण्याचे नियोजन केले. 5300 मीटरच्या चढाईदरम्यान सर्व शारीरिक क्षमतांचा विचार करण्यात आला.

संशोधन अहवाल सांगतो, जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते तेव्हा ऊर्जा निर्माण होते. हे शरीरात उपस्थित असलेल्या मायटोकॉन्ड्रियामुळे होते. संशोधनातून समोर आले आहे की शेर्पाचे माइटोकॉन्ड्रिया इतर गिर्यारोहकांपेक्षा चांगले काम करतात. त्यांचे शरीर त्यांना अधिक ऊर्जा देते.

प्रक्रिया चांगल्या सरासरी कारसाठी अगदी सारखीच आहे. यामुळेच त्यांना कमी ऑक्सिजन लागतो आणि जास्त ऊर्जा मिळते. शेर्पांवरील इतर संशोधनात असे आढळून आले की उंचीवर, सामान्यतः इतर गिर्यारोहकांमध्ये रक्ताभिसरण कमी होऊ लागते, परंतु शेर्पांच्या बाबतीत असे घडत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT