NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOU) काही महत्त्वाचे दुवे मिळाले आहेत. जसजसा तपास सुरू आहे तसतसे पेपरफुटीचे धागेदोरे जुळत आहेत. आता आणखी दोन जण तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत आणि आतापर्यंत केलेल्या तपासात या दोघांची नावे पेपरफुटीत समोर येत आहेत.
मुलांना प्रश्नपत्रिका पुरवणारे आणि त्यांची उत्तरे लक्षात ठेवायला लावणारे अमित आनंद आणि नितीश हे दोघे सांगण्यावरून काम करत असल्याची माहिती आहे, तर या प्रकरणाचे मुख्य दोन सुत्रधार वेगळे आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल वात्से आणि अंशुल सिंग या दोन सेटरलाही ईओयूने लक्ष्य केले आहे. हे दोघेही वैशाली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान या दोघांची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत. EOU याची चौकशी करत आहे. या दोघांची नावे समोर आल्यानंतर तपास यंत्रणा अतुल आणि अंशुल यांच्याकडे आधीच पेपर होता का याचा तपास करण्यात येत आहे. त्याची पुढील लिंक जोडण्याचीही प्रयत्न सुरू आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या सांगण्यावरूनच अमित आनंद आणि नितीश कुमार हे बिहारमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सेटर म्हणून काम करायचे, हे लोक भरमसाठ पैसे आकारून उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत करायचे. अतुल वात्स्य गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील एका शहरात राहतो.
5 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा निकाल ४ जूनला निवडणूक निकालांच्या रणधुमाळीतच जाहीर झाला आणि देशात एक मोठं वादळ निर्माण झालं. दरवर्षी साधारण परीक्षा झाल्यापासून ४० दिवसांमध्ये हा निकाल जाहीर होतो. यावर्षी तो १४ जून रोजी जाहीर होणार होता. मात्र दहा दिवस आधीच तो जाहीर करण्यात आला. या वर्षीच्या निकालात फारच विस्मयकारक असे खुलासे झाले. त्यामध्ये ७२० पैकी ७२० गुण घेणारे एकूण ६७ विद्यार्थी यादीत दिसले.
‘न भूतो न भविष्यती’ असा ‘रेकॉर्डब्रेक टॉपरचा’ निकाल लागला, मात्र त्यामध्ये ७१८ आणि ७१९ गुण मिळवणारे विद्यार्थीही दिसल्यावर या क्षेत्रातील जाणकारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि या संपूर्ण निकालाचा भांडाफोड झाला. कारण ७१८ किंवा ७१९ गुण हे नीट परीक्षांमध्ये कधीही मिळू शकतच नाहीत. याचं कारण म्हणजे या परीक्षेमध्ये ‘निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम’ असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.