Patna Meeting 
देश

Patna Meeting: विरोधकांच्या बैठकीत ठरला कार्यक्रम; 'असा' असणार किमान समान कार्यक्रम!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले असून आज त्यांची महत्वपूर्व बैठक पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले असून आज त्यांची महत्वपूर्व बैठक पार पडते आहे. या बैठकीत पुढे काय करायचं हा कार्यक्रम देखील ठरला असल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांकडून मिळते आहे. विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली आहे. (Patna Meeting in opposition meeting common minimum program will do key role)

बैठकीचे आयोजक कोण?

वर्षभरापूर्वी भाजपसोबत बिहारमध्ये सत्तेत असलेले जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या या बैठकीच आयोजन केलं आहे. बिहारची राजधानी पटना इथं ही बैठक होत आहे. विरोधकांची ही पहिलीच बैठक असल्यानं त्याकडं भाजपचंही लक्ष आहे. भाजपच्या गोटातून या बैठकीवर प्रतिक्रियाही यायला लागल्या आहेत.

'या' नेत्यांची उपस्थिती

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील मोठे नेते दाखल झालेले आहेत. (Latest Marathi News)

बैठकीत नेमकं काय ठरलं?

बिहारची राजधानी पटना इथं ही महत्वाची बैठक सुरु असून या बैठकीत १५ विरोधी पक्षांचे प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानुसार, सर्व पक्षांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात किमान समान कार्यक्रम हाती घेण्याचं ठरलं आहे. या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांचा समावेश असेल. (Marathi Tajya Batmya)

असा असेल कार्यक्रम?

  • आपापसातील मतभेद बाजुला सारुन भाजपला हारवण्यासाठी एकत्र येणं महत्वाचं.

  • विरोधकांच्या एकजुटीच्यावतीनं राज्यनिहाय बैठका घेतल्या जाणार जातील.

  • प्रत्येक पक्षांचे वरिष्ठ नेते राज्यांचे दौरे करतील.

'या' पक्षांपासून विरोधकांच्या एकतेला धोका!

विरोधकांच्या एकजुटीत १५ पक्षांचा समावेश असला तरी अनेक विरोधीपक्षांनी यापासून दूर राहणं पसंद केलं आहे. यामध्ये त्यांच्या काही वैयक्तिक राजकीय भूमिका आडव्या येत असाव्यात. पण त्यामुळं विरोधकांच्या एकजुटीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चाही सुरु झाली आहे.

वंचित बहुजन आघाडी (प्रकाश आंबेडकर), भारत राष्ट्र समिती (के. चंद्रशेखर राव), एमआयएम (असदुद्दीन ओवैसी), बहुजन समाज पार्टी (मायावती) हे पक्ष जर स्वतंत्रपणे लढले तर विरोधकांच्या एकजुटीला धोका निर्माण होऊ शकते, अशी भीती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बैठकीत व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Maharashtra Rally: महाराष्ट्र जिंकण्यासाठी PM मोदी लावणार जोर! सलग 8 दिवस होणार सभा; कुठे अन् कधी? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस नेते आबा बागुलांनी दाखल केला पर्वती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

IND vs NZ 2nd Test : निगेटीव्ह कॅप्टन...! रोहित शर्मावर बरसले Sunil Gavskar; नेमकं काय झालं असं?

दारापुढे, पाटापुढे झटपट... रात्री २ वाजता ऐकलेल्या व्हिडीओचं यशराज मुखातेने बनवलं रांगोळी रॅप, तुम्ही ऐकलंत का?

Pune Airport Blast Threat: पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवण्याची धमकी; शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT