मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ज्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला ते पत्राचाळ पुनर्विकास प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ईडीनं याप्रकरणी मोठी कारवाई केली असून यातील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. (Patra Chawl redevelopment Case ED attaches properties of Rakesh and Sarang Wadhawan)
एएनआयच्या वृत्तानुसार, पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. यांच्या ३१.५० कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती अर्थात इमारती ईडीनं जप्त केल्या आहेत.
दरम्यान, पत्राचाळ कथीत घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं होतं, तीन महिने तुरंगात घालवल्यानंतर सध्या ते जामिनावर तुरुंगात बाहेर आहेत. संजय राऊतांना विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला असला तरी कोर्टानं ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महत्वाची टिप्पणीही केली होती.
राऊत यांची अटक बेकायदेशीर होती, असं कोर्टानं आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं. ईडीनं संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना तातडीनं अटक केली पण प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक का केली नाही? असा सवालही कोर्टानं विचारला होता. साक्षीदारांच्या जबाबातून वाधवान यांचा सहभाग उघड होतो, असंही कोर्टानं म्हटलं होतं. तसेच प्रवीण राऊत यांना दिवाणी वादावरुन अटक झाली. तर यातील म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटत असताना म्हाडाच्या कुठल्याही कर्माचाऱ्यावर कारवाई झालेली दिसली नाही, असंही ऑर्डरमध्ये म्हटलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.