Pawan Khera  sakal
देश

Pawan Khera Arrested : काँग्रेस नेते पवन खेरांना आसाम पोलिसांकडून अटक

पवन खेरा दिल्लीहून रायपूरला निघाले होते. त्यावेळी त्यांना विमानात चढण्यास मनाई करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Pawan Khera Arrested : काँग्रेस नेते पवन खेरा यांना आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पवन खेरा दिल्लीहून रायपूरला निघाले होते. त्यावेळी त्यांना विमानात चढण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, खेरा यांना दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यानंतर त्यांना ट्रांझिट रिमांडवर आसामला नेले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खेरा यांच्या अटकेसंबंधीच्या याचिकेवर आज दुपारी ३ वाजता सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.

आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग पोलीस ठाण्यात काँग्रेस नेते पवन खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आसामचे पोलिस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) आणि प्रवक्ते प्रशांत कुमार भुईया यांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाची परवानगीनंतर खेडा यांना आसाममध्ये आणले जाणार असल्याचे ते म्हणाले.

प्रकरण नेमकं काय?

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर भाजपकडून खेडा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंत आज खेडा यांना दिल्ली विमानतळावर प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.

खेडांची अटक म्हणजे हुकूमशाही  

दरम्यान, खेडा यांच्या अटकेनंतर काँंग्रेस नेते आक्रमक झाले असून, काँग्रेस नेत्यांकडून ही अटक म्हणजे हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. खेडा यांचे सामान तपासण्याचे कारण देत त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT