Narendra Modi Dhananjay Mahadik esakal
देश

Dhananjay Mahadik : देशाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम मोदींनी केलंय; महाडिकांकडून तोंडभरुन कौतुक

पंतप्रधान मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता निर्माण झाली.

सकाळ डिजिटल टीम

सामान्य माणसाला आपलेसे वाटणारे नेतृत्व मोदींचे आहे. देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले आहे.

शिराळा : गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आहे. त्यांनी गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या. त्याचा फायदा जनतेला होत आहे,’’ असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नऊ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जनसंपर्क अभियानाच्या नियोजनासाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत (Shirala) ते बोलत होते. संचालक सत्यजित देशमुख, माजी सदस्य सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, संपतराव देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, अशोकराव पाटील, उषाताई दशवंत, विद्याताई पाटील, डॉ. सचिन पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार व जनसंपर्क अभियान समितीचे सदस्य महाडिक म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता निर्माण झाली. जगातील प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

'आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला गॅस, ८० कोटी लाभार्थींना मोफत रेशन, किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, जल जीवन मिशन अशा विविध योजना राबवल्या आहेत. देशहितासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम उभे राहिले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षे सरकारला झालेली आहेत. नऊ वर्षांमध्ये झालेल्या कामांची माहिती घरोघरी पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.'

सत्यजित देशमुख म्हणाले, ‘‘सामान्य माणसाला आपलेसे वाटणारे नेतृत्व मोदींचे आहे. देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले आहे. उत्तम प्रशासक म्हणून संपूर्ण जग त्यांच्याकडे पाहत आहे. २९ महिन्यांमध्ये संसद भवन बांधण्याचा विश्वविक्रम त्यांनी करून दाखवला आहे. मोदींचे नेतृत्व हे नागरिकांमध्ये समरस होऊन काम करणारे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा.’’

रणजितसिंह नाईक, के. डी. पाटील, प्रतापराव पाटील, सुमंत महाजन, केदार नलवडे, पार्थ शेटे, प्रताप घाटगे, जयकर कदम, संजय घोरपडे, जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, सम्राट शिंदे, भोजराज घोरपडे, रणजित पाटील, संपत चरापले, तानाजी पवार, अशोक पाटील, धनाजी नरूटे, अभिजित पाटील, उत्तम गावडे, प्रकाश चव्हाण, प्रदीप कदम, रणजित कदम, शुभम खोत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT