High Court of Karnataka टिम ई सकाळ
देश

कर्नाटक: कॉलेजमध्ये हिजाब बंदीविरोधात हायकोर्टात याचिका

हिजाब घालू देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयात (High Court of Karnataka) याचिका दाखल करण्यात आली आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यात यावी, असे याचिकेत (Petition) म्हटले आहे.

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मुस्लिम मुलीनी हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला. आता यावर महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणावर काही दिवसापुर्वी कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश (BC Nagesh) यांनी प्रतिक्रिया दिली होती. शाळा आणि महाविद्यालये धर्म पाळण्याची जागा नाही. हिजाब घालणे हे अनुशासनहीनता असल्याचे बी.सी. नागेश यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या मुद्दयावरून राजकारण करण्याचा हा प्रकार असल्याचेही बीसी नागेश यांनी बोलून दाखवले होते तर मुस्लिम विद्यार्थिनींनी मात्र याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT