नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine war) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (crude oil) दर गगनाला भिडले आहेत. भारतातही यामुळे इंधन महागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा (Uttar Pradesh election) रविवारी सातवा टप्पा पार पडला. याशिवाय इतर राज्यांतही विधानसभा निवडणुका सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (central government) मागील चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर ठेवले होते; परंतु १६ मार्चनंतर पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-diesel rates) थोडेथोडके नाही तर १२ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर ९ वर्षांच्या उचांकीवर पोहोचले आहेत. गुरुवारी कच्चे तेल १२० डॉलर प्रति पिंप या दरावर पोहोचले होते. शुक्रवारी कच्चे तेल १११ डॉलर प्रति पिंप या दराने विकले गेले. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एका अहवालानुसार मागील दोन महिन्यांत जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले असून तेल कंपन्यांना मोठा बोझा सहन करावा लागत आहे. देशांतर्गत तेल कंपन्या उत्पादनाच्या भरपाईसाठी १६ मार्चनंतर पेट्रोल-डिझेलचे दर १२ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवू शकतात. अहवालानुसार भारत आपल्या आवश्यकतेच्या ८५ टक्के कच्चे तेल आयात करते. त्यामुळे देशांतर्गत इंधनाचे दर कच्च्या तेलातील दरवाढीने प्रभावित होतात.
१८५ डॉलरपर्यंत दर वाढणार!
मॉर्गन स्टॅनलीच्या मते अमेरिका आणि युरोपीय देशांच्या निर्बंधामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात करण्यावर बंधन येत आहेत. सध्या रशिया ६६ टक्के कच्च्या तेलाची निर्यात करत आहे. जर रशियातून असाच कमी पुरवठा होत राहिला तर बाजारातील कच्च्या तेलाचे दर १८५ डॉलरपर्यंत पोहोचू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.