PF news 
देश

PF खात्याशी आधार लिंक नव्हता ; फ्रॉड गँगचा फिल्मी स्टाईल गंडा!नागपूर, संभाजीनगरशी कनेक्शन

Sandip Kapde

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका भामट्याला अटक केली आहे.

आरोपी ऑनलाइन पीएफसाठी क्लेम करायचे आणि नंतर आधार कार्डचा डेटा बदलून पैसे काढायचे. हे प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचल्यावर तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे.

सीबीआयने फसवणूक करणाऱ्या लोकांच्या टोळीपर्यंत पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार या पूर्ण घटनेचे मास्टरमाइंड प्रियांशू कुमार आहेत. जो दिल्लीत राहतो. त्याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ज्या लोकांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी लिंक नाही, अशा लोकांना टार्गेट केले.

त्याने आपल्या टोळीच्या मदतीने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण टोळीने कथितरित्या अशा लोकांना लक्ष्य केले होते ज्यांचे आधार कार्ड त्यांच्या पीएफ खात्यांशी लिंक नव्हते.

या टोळीने ११ खातेदारांना फसवलं आहे. यांनी ३९ खोटे क्लेम केले असून १.८३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तक्रारीनुसार ८ फेब्रुवारी २०२२ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. खातेदारांच्या पीएफ खात्यातून बेकायदेशीरपणे पैसे काढण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता.

असा सुरू होता खेळ -

या टोळीने नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पाटणा, रांची यांसारख्या विविध शहरांमध्ये कार्यालय स्थापन केले. ज्यामध्ये कोणत्याही मॅन्युअल पडताळणीशिवाय पीएफ कव्हरेज ऑनलाइन घेतले जात होते. कार्यालयाशी जोडलेले युनिक खाते क्रमांक (UAN) एकूण खात्यांच्या संख्येच्या तुलनेत खूप जास्त होते.

फसवणूक करणार्‍यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांचे UAN नोंदवले आणि त्यांना दैनंदिन कर्मचारी दाखवले. त्यांचा KYC तपशील बदलण्याची सोय देखील करण्यात आली होती, असे सीबीआयच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांची UAN क्रमांकांची नोंदणी केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या टोळीने समान नाव असलेले लोक शोधले किंवा समान नावे असलेल्या व्यक्तींचा आधार डेटा बदलला. सध्याचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्यांनी त्यांचे नाव, जन्मतारीख असलेले आधार कार्ड मिळवले.

मास्टरमाइंड प्रियांशू कुमारने 'बदललेले आधार कार्ड' नोंदणीकृत केले आणि ते संबंधित कार्यालयाशी लिंक केले. फसवणूक करणारे खऱ्या पीएफ सदस्यांच्या वतीने अनेक ऑनलाइन क्लेम करायचे आणि फसवणूक करून पीएफ फंड काढायचे, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. याप्रकरणी अजून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT