Popular Front of India vs NIA esakal
देश

Kerala : PFI विरोधातील कारवाईचे हिंसक पडसाद; वाहनांच्या तोडफोडीसह भाजप कार्यालयावर हल्ला

तिरुवनंतपुरममध्ये कार आणि ऑटो रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

तिरुवनंतपुरममध्ये कार आणि ऑटो रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे.

तिरुवनंतपुरम : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियानं (Popular Front of India PFI) एनआयएच्या (NIA) नेतृत्वाखाली विविध एजन्सींनी गुरुवारी त्यांची कार्यालयं, नेत्यांची घरं आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यांचा निषेध करण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी संपाची हाक दिली आहे. पीएफआयनं आज केरळमध्ये (Kerala) बंद पुकारला आहे.

यादरम्यान केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) कार आणि ऑटो रिक्षाची तोडफोड करण्यात आली, तर तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये पीएफआयनं सदस्यांच्या अटकेनंतर हिंसक निदर्शनं केली आहेत. यादरम्यान भाजपच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आहे. भाजप (BJP) कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एनआयए आणि ईडीचे हे छापे पीएफआयनं देशातील दहशतवादी कारवायांना कथित समर्थन केल्याच्या संदर्भात टाकले आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक 22 पीएफआय कार्यकर्त्यांना अटक

एनआयए आणि इतर एजन्सींनी गुरुवारी 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यावेळी पीएफआयचे 106 नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. केरळमध्ये सर्वाधिक 22 पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये त्यांचे अध्यक्ष ओएमए सलाम यांचाही समावेश आहे. भाजपच्या केरळ युनिटनं पीएफआय विरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडं केली आहे. दरम्यान, पीएफआयनं आज (शुक्रवार) पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर केरळ पोलिसांनी राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT