pharma company Pfizer India employees to get 12-week paternity leave Check all details here  
देश

Paternity Leave Policy : वडिलांनाही मिळणार बाळंतपणाची रजा! प्रसिध्द कंपनीचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Paternity Leave Policy : आत्तापर्यंत तुम्ही ऐकले असेल की जर एखाद्या कंपनीत महिला कर्मचारी आई झाली तर तिला प्रसूती रजा (Maternity Leave) दिली जाते. पण आता एक कंपनी अशी आहे जी वडील झाल्यानंतरही आपल्या पुरुष कर्मचाऱ्याला पॅटर्निटी लीव्ह (Paternity Leave Policy) देणार आहे.

या कंपनीचे नाव आहे Pfizer India असून कंपनीमध्ये पॅटर्निटी लीव्ह पॉलिसी लागू करण्याची घोषणा केली आहे. Pfizer India कंपनीने हे नवीन धोरण 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहे.

पॅटर्निटी लीव्ह पॉलिसी काय आहे?

Pfizer India ने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी 12 आठवड्यांची पॅटर्निटी लीव्ह पॉलिसी लागू केले आहे. या धोरणांतर्गत जे कर्मचारी पिता बनतील ते 2 वर्षांच्या आत या सुट्ट्यांचा लाभ घेऊ शकतात.

ही रजा घेणार्‍यांना एकावेळी किमान दोन आठवडे आणि जास्तीत जास्त 6 आठवड्यांची रजा मिळू शकते. तसेच बायोलॉजिकल पित्यासोबत, दत्तक पिता देखील या पॉलिसी अंतर्गत सुमारे 3 महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह घेऊ शकतात.

2 वर्षांच्या आत रजा घेता येईल

कंपनीच्या या पॉलिसीमध्ये जे कर्मचारी वडील बनतील ते 2 वर्षांच्या आत या सुट्ट्यांचा लाभ घेऊ शकतात. पॅटर्निटी लीव्ह घेणार्‍यांना एकावेळी किमान दोन आठवडे आणि कमाल सहा आठवड्यांची रजा घेण्याची सुविधा आहे.

इतर कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रसंगात कर्मचारी कंपनीच्या रजा पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर सुट्ट्या देखील घेऊ शकतील ज्यात कॅज्युअल लीव्ह, इलेक्टिव्ह लीव्ह आणि वेलनेस लीव्ह यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT