कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये देशाला आर्थिक मदत निर्माण व्हावी म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पीएम केअर फंडची (PM Care Fund) घोषणा केली होती. त्यानंतर पीएम केअर फंडमध्ये तब्बल10990 कोटी रुपये जमा झाले. मात्र याबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जमा झालेल्या या एकूण रकमेपैकी तब्बल 64 टक्के रकमेचा वापरच झाला नाही. मार्च 2021 पर्यंत या पीएम केअर फंडमध्ये 7012 कोटी रुपये होते. तर एकूण रकमेपैकी फक्त 3976 कोटी रुपये त्यावेळी वापरण्यात आले होते.
आर्थिक वर्ष 2021 मध्ये सुद्धा 7679 कोटी रुपये जमा झाले. पीएम केअर फंडमधून मार्च पर्यंत फक्त 3976 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातील 1392 कोटी रुपयांचा वापर ६ कोटी 60 लाख लसी विकत घेण्यासाठी करण्यात आल्याचं समजतंय. तर 1211 कोटींचा निधी 50,000 हजार व्हेंटीलेटर खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला होता. मात्र या व्हेंटीलेटर पैकी अनेक व्हेंटीलेटर हे खराब असल्याचं समोर आलं होतं.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, सुमारे 494.91 कोटी रुपये परदेशी देणगीतून मिळाले. तर 7,183 कोटी रुपयांहून अधिक निधी हा ऐच्छिक दानाच्या स्वरूपात आला. तर 2019-20 मध्ये, निधीमध्ये एकूण 3,076.62 कोटी रुपये प्राप्त गोळा झाले होते. 27 मार्च 2020 ला पीएम केअर फंडाची स्थापना झाल्या नंतरच्या अवघ्या पाच दिवसांत ही रक्कम जमा झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.