नवी दिल्ली : लोकसभेत आज विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत केलेल्या एका विधानामुळं मोठा गोंधळा झाला. यावेळी राहुल गांधी यांचं भाषण सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्येच जागेवरुन उभं राहत या विधानावर प्रतिक्रिया दिली. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसेशी जोडणं ठीक नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (PM Modi and Amit Shah speak on Rahul Gandhi statement about Hindu in Lok Sabha)
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, जे लोक स्वतःला हिंदू म्हणून घेतातते२४ तास हिंसा, हिंसा, द्वेष, द्वेष, असत्य, असत्य, असत्य करत असतात. हे खरंतर हिंदूच नाहीत. तुम्ही हिंदूच नाही आहात. हिंदू धर्मात हे स्पष्टपणे लिहिलंय की, सत्यासोबत उभं राहिलं पाहिजे. सत्यापासून मागे हटता कामा नये, अहिंसेचं तत्व अवलंबलं पाहिजे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
दरम्यान, राहुल गांधी यांना मध्येच थांबवत मोदी म्हणाले, संपूर्ण हिंदू समुदयाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे. संपूर्ण हिंदू समाजालाच हिंसक म्हणणं चुकीचं आहे. त्यावर राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, मी भाजपला हिंसक म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे संपूर्ण हिंदू समाज नाहीत किंवा भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही.
अमित शाहांनी देखील दिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या या विधानावर पलटवार करताना अमित शाह म्हणाले, गोंधळ घालून इतकं मोठं सत्य थांबवलं जाऊ शकत नाही. विरोधीपक्ष नेत्यांनी म्हटलं की, जे स्वतःला हिंदू समजतात ते हिंसा करतात. हिंसेची गोष्ट करतात. त्यांना कदाचित माहिती नसेल करोडो लोक स्वतःला गर्वानं हिंदू म्हणवून घेतात. ते सर्वजण हिंसा करतात का? हिंसेच्या भावनेला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये. सभागृहात संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीवर असं बोलू नये. मला वाटतं त्यांनी माफी मागायला हवी.
शहा पुढे म्हणाले की, मी त्यांना एक विनंती करु इच्छितो की इस्लाममध्ये अभयमुद्रा, यावर इस्लामिक विद्वानांची मतं त्यांनी एकदा ऐकावित. गुरुनानाक साहेब यांच्या अभयमुद्रेवर एसजीपीसीचं मतही त्यांनी जाणून घ्यावं. अभयबाबत बोलण्याचा यांना कसलाही अधिकार नाही. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाला यांनी भीतीच्या छायेत लोटलं. लाखो लोकांना तुरुंगात डांबलं, वैचारिक दहशत तर त्यावेळी होता जेव्हा आणीबाणी लावली गेली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.