PM Modi Sakal
देश

Video : युक्रेनमध्ये तिरंगा बनला भारतीयांचं कवच; कारगिलमध्ये PM मोदींनी वाढवले जवानांचे मनोबल

आज देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Celibrate Diwali With Army Jawan In Kargil : देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आजच्या या आनंदाच्या क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल येथे जात भारतीय जवानांचे मनोबल वाढवले. यावेळी त्यांनी रशिया युक्रेन युद्धादरम्यान कशा पद्धतीने भारतीय तिरंगा नागरिकांचे सुरक्षा कवच म्हणून उदयास आले यााबाबत सांगितले. सैनिकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, माझं भाग्य की मला तुमच्यासोबत सीमेवर गेल्या अनेक वर्षापासून दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत आहे.

कारगिलमध्ये भारतीय सैन्याने दहशतवादाचा मुकाबला करत देशाचे रक्षण केले होते. हा विजय देशासाठी एकप्रकारे दिवाळीचा उत्साह साजरा करण्यासारखाच होता. कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगिलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही असं म्हणत नरेंद्र मोदींनी कारगिलच्या विजयाच्या आठवणींना उजाळा दिला.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले त्यावेळी तेथे अडकलेल्या भारतीयांसाठी तिरंगा कसा संरक्षक कवच बनला हे सर्वांनी पाहिले. आज भारत अंतर्गत आणि बाह्य शत्रूंसोबत आघाडी घेत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी कारवायांचे विचार मुळापासून नष्ट केली जात असून, आज देशहिताचे मोठे निर्णय वेगाने घेतले जात असल्याचे ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारतावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

"देशाच्या सुरक्षेचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे आत्मनिर्भर भारत, आधुनिक स्वदेशी शस्त्रे. मला आनंद आहे की, आज एकीकडे आपले सैन्य भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांचा अवलंब करत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य भारतीय लोकलसाठीही आवाज. ."

तुम्ही आहात म्हणून देश सुरक्षित

यावेळी सीमाभागात भारतीय जवान डोळ्यात तेल घालून देशाचं आणि देशवासियांचे रक्षण करत आहेत. भारतीय सैन्य आहेत म्हणूनच सगळे भारतीय सुरक्षित आहेत. पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो आणि यामध्ये जवानांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे जवान हेच माझं कुटुंब आहे असंही मोदी म्हणाले.

'देश गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होत आहे'

आज देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. राजपथ हे गुलामगिरीचे प्रतीक होते, आज ते कर्तव्य पथ बनून नव्या भारताची प्रतिमा दाखवत आहे. आता नौदलाच्या ध्वजात वीर शिवाजींची प्रेरणा जोडली गेल्याचे मोदी म्हणाले. आज संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या वाढत्या ताकदीवर आहे. जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा शांततेची आशा वाढते आणि जगात संतुलन येते असेही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT