नवी दिल्ली - देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाची मोहीम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. एम्समध्ये मोदींना लस टोचली. एम्स'मधील कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण सर्वात वेगळा ठरला. अचानक पंतप्रधान येताच आतील वातावरण एकदम गंभीर झाले होते. तेव्हा परिस्थिती ओळखून मोदींनीच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी हसतखेळत संवाद साधायला सुरुवात केली. पुदुच्चेरीच्या पी. निवेदन या परिचारिकेने पंतप्रधानांना लस टोचली. यावेळी मोदींनी त्यांना त्यांच्या गावाचे नाव वगैरे बाबतची माहिती विचारली.
लसीकरणावेळी संवाद साधताना मोदी म्हणाले की, " राजकारणी लोक फार जाड कातडीचे मानले जातात. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी जनावरांना वापरतात ती सुई तर वापरणार नाही ना?" मोदींच्या या प्रश्नावर उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये हास्याचे फवारे उडाले.
निवेदा यांनी ट्विट करून आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, “ लस टोचून झाल्यावर सरांची (मोदी) पहिली प्रतिक्रिया होती की "लस टोचून झाली देखील? मला तर कळले देखील नाही. त्यानंतर मोदी यांनी निवेदा यांना, तुम्ही कुठं राहता अशीही विचारणा कली. यावेळी मोदीना लस देताना मूळच्या केरळच्या असलेल्या दुसऱ्या परिचारिकाही शेजारी होत्या.
पंतप्रधान आज अचानक एम्समध्ये दाखल झाले होते. त्यांच्या या भेटीचे नियोजन ऐनवेळी आखण्यात आल्याने पंतप्रधान व राष्ट्रपती ज्या मागनि जातात तो रस्ता संपूर्ण बंद करण्याची व्हीआयपी उपाययोजनाही सुरक्षा यंत्रणेने केली नव्हती.
कोव्हॅक्सिनवरून झाला होता वाद कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या
अखेरच्या टप्प्यात असतानाच तिच्या वापरास केंद्राने आपत्कालीन परवानगी दिल्याने नव्या वादाला सुरुवात झाली होती. जी लस प्रमाणित नाही तिचा वापर सुरू करून सरकार जनतेच्या जिवाशी खेळत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. दिल्लीच्या आरएमएलमधील डॉक्टरांनी पहिल्याच दिवशी या लसीविरोधात आंदोलन केले होते. यावरून संसदेत गदारोळही झाला होता. मोदींनी स्वतः कोरोनाच्या दोन्ही भारतीय लशी सुरक्षित आहेत, असे सांगितले होते. त्यावर काँग्रेसने स्वतः मोदीनी कोव्हक्सिन ही लस टोचून घ्यावी असे प्रतिआव्हान दिले होते. 'आता तुम्हीही लस टोचून घ्या, असे आवाहन मोदीनी लस घेतल्यानंतर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.