नवी दिल्ली : तेलंगाणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केसीआर यांना टार्गेट केलं. तसेच त्यांना एनडीएत का घेतलं नाही, याचं कारणही सांगितलं. त्याचमुळं ते आपल्याला कायम शिव्या घालतात असंही मोदींनी सांगितलं. (PM Modi criticises at Telangana Cm KCR says because of was not included in NDA he abuses us)
मोदी म्हणाले, "केसीआर यांना भाजपच्या वाढत्या ताकदीचा अंदाज आला होता. त्यामुळंच ते भाजपसोबत मैत्री करण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्नात होते. एकदा ते दिल्लीला आले होते, तेव्हा देखील त्यांनी मला भेटूनही हीच विनंती केली होती. (Latest Marathi News)
पण भाजप कधीही तेलंगाणाच्या जनतेच्या इच्छेविरुद्ध कुठलंही काम करु शकत नाही. त्यामुळंच भाजपनं केसीआर यांना एनडीएत येण्यास विरोध केला. तेव्हापासून बीआरएस आणि केसीआर मला शिव्या द्यायचा एकही संधी सोडत नाहीत" (Marathi Tajya Batmya)
बीआरएसला मोदी कधीही भाजपच्या जवळपासही भटकू देणार नाही, ही गॅरंटी पण मोदींची गँरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.