PM Narendra Modi Inaugurates Sudarshan Setu Esakal
देश

Sudarshan Setu: 'अटल सेतू'नंतर मोदींनी केलं देशातील सर्वात लांब केबल ब्रिजचं लोकार्पण; 'सुदर्शन सेतू'ची काय आहे खासियत?

Sudarshan Setu: पंतप्रधान मोदींनी 25 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील द्वारका येथे 'सुदर्शन सेतू'चे उद्घाटन केले. हा केबल पूल ओखा ते समुद्राच्या मध्यभागी वसलेल्या बेट द्वारकाला जोडतो. त्याची इतर वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशातील पायाभूत सुविधांचे आणखी एक अनोखे उदाहरण देशात निर्माण झाले आहे. हा सुदर्शन पूल आहे. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे. या पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. गुजरातमधील द्वारका येथे बांधलेल्या या पुलाची खास वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया.(PM Modi in Gujarat Inaugurates Sudarshan Setu Indias longest cable-stayed bridge in Dwarka)

पूल किती किलोमीटर लांब?

पंतप्रधान मोदींनी 25 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील द्वारका येथे 'सुदर्शन सेतू'चे उद्घाटन केले. हा केबल पूल ओखा ते समुद्राच्या मध्यभागी वसलेल्या बेट द्वारकाला जोडतो. जर आपण त्याची लांबी पाहिली तर ती सुमारे 2.32 किलोमीटर लांब आहे.

2016 मध्ये मिळाली मान्यता

या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २०१६ साली मंजुरी दिली होती. पंतप्रधान मोदींनी 7 ऑक्टोबर 2017 रोजी ओखा आणि बेट द्वारका यांना जोडणाऱ्या पुलाची पायाभरणी केली होती. आधी त्याची अंदाजे किंमत 962 कोटी रुपये होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली.

'सुदर्शन सेतू'च्या खास गोष्टी

979 कोटी रुपये खर्चून 'सुदर्शन सेतू' बांधण्यात आला आहे. तो ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज म्हणूनही ओळखला जाईल. रहिवासी आणि द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.

चौपदरी असलेल्या 27.20 मीटर रुंद पुलाच्या दोन्ही बाजूला 2.50 मीटर रुंद पदपथ आहे. सुदर्शन ब्रिजचे डिझाईन अनोखे असल्याचे सांगण्यात येत आहे. यात श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेला फूटपाथ आहे.

फूटपाथच्या वरच्या भागात सौरऊर्जेचे पॅनेलही बसवण्यात आले असून, यातून एक मेगावाट वीजनिर्मिती होणार आहे.

सुदर्शन सेतू बांधण्यापूर्वी यात्रेकरूंना द्वारकेला जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. त्यांना बोटीवर अवलंबून राहावे लागल असे. हवामान खराब असेल तर लोकांना थांबावे लागत असे. मात्र, आता या पुलाच्या बांधकामामुळे मोठा दिलासा मिळाला असून ते द्वारकेचे प्रमुख पर्यटन केंद्र म्हणूनही काम करेल. याशिवाय प्रवासी भाविकांचा बराच वेळ वाचणार आहे.

'सिग्नेचर ब्रिज' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलाचे नाव आता 'सुदर्शन सेतू' किंवा सुदर्शन पूल असे करण्यात आले आहे. बेट द्वारका हे द्वारका शहरापासून ३० किमी अंतरावर ओखा बंदराजवळील एक बेट आहे, जिथे भगवान कृष्णाचे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT