Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar esakal
देश

Rajasthan DCM: महाराष्ट्र, मध्यप्रदेश अन् आता राजस्थान! 'हा' आहे मोदींचा नवा उपमुख्यमंत्री पॅटर्न

राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपकडून मंगळवारी केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपकडून मंगळवारी केली. पण यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये एक कॉमन पॅटर्न दिसून आला आहे. तो म्हणजे दोन उपमुख्यमंत्री! म्हणजेच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. (PM Modi new DCM pattern Rajasthan DCM name announced by BJP as Diya Kumari and Premchand Bairavi)

राजस्थानच्या उपमुख्यंमत्रीपदी 'या' नावांची घोषणा

दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे राजस्थानचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर यंदा पहिल्यांदाच निवडून आलेले सांगानेर मतदार संघाचे आमदार भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री असणार आहेत. (Latest Marathi News)

काय आहे मोदींची योजना?

यंदाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली होती. कारण लोकसभेपूर्वीची ही सेमीफायनलच मानली गेली. या पाच राज्यांपैकी तेलंगाणा आणि मिझोरामध्ये भाजपची ताकद कमी आहे. पण उर्वरित राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी हार्टलँड मध्ये भाजप स्वबळावर सत्ता आणू शकते आणि तशी त्यांनी आणली देखील. पण या तीन राज्यांसाठी भाजपनं आपली पारंपारिक राजकीय स्ट्रॅटेजी बाजूला सारून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता. त्यानंतर आता संभाव्य नावांना बाजुला सारुन नवे चेहरे मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करुन धक्कातंत्र वापरलं आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर एक वेगळा पॅटर्नही यातून दिसून आला आहे तो म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. बरं हे दोनच का? तर त्यामागं अशी रणनिती असल्याचं सांगितलं जात आहे की, उपमुख्यमंत्रीपद मिळालेले चेहरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण अँटिइन्कम्बन्सी आणि बदल दिसावा यासाठी मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे देण्यात आले, पण या शर्यतील इतरांना मुख्यमंत्रीपदाच्या खालोखाल उपमंत्रीपद देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र, मध्य प्रदेशात 'या' पॅटर्नचा वापर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडामुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपनं शिंदेंच्या मदतीनं सरकारनं स्थापन केलं. पण या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. त्याचबरोबर नंतर राष्ट्रवादीतीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर ते देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीनंतर तिथेही दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. यांपैकी एक राजेंद्र शुक्ला आणि दुसरे दगदीश देवडा उपमुख्यमंत्री बनले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT