Buldhana Bus Accident PM Modi Expresses Grief Over Bus Accident, Announces Rs 2 Lakh Ex Gratia  sakal
देश

PM Modi On India : 'इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही इंडिया आहे' पंतप्रधान मोदींची विरोधकांवर मोठी टीका

भाजपला आगामी लोकसभेत पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्ष आले आहेत एकत्र

सकाळ डिजिटल टीम

PM Modi On India : पंतप्रधान नरेंद्र मोदी किंबहुना भाजपला आगामी लोकसभेत पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव दिले आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार ) (sharad pawar), आणी शिवसेना (ठाकरे) (uddhav thakre) हे तीन मुख्य विरोधी पक्ष सुद्धा या गटामध्ये सामील झाले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी या विरोधकांच्या आघाडीवर टीका केली आहे. यावेळी टीका करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, केवळ इंडिया हे नाव ठेवल्याने काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिद्दिनच्या नावातही इंडिया आहे.(East India Company And Indian Mujahideen)

पावसाळी अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही, असे विरोधकांच्या वृत्तीवरून दिसत आहे. पावसाळी अधिवेशनातील संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT