देश

Modi on No Confidence Motion: विरोधक झाले टार्गेट अन् शेअर मार्केटवाल्यांना मिळाला PM मोदींचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी विरोधकांवर त्यांनी चौफेर टीका केली. सरकारी कंपन्यांबाबत त्यांनी केलेल्या विधानांवरुन मोदींनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक मंत्रही दिला. (PM Modi on No Conficence Motion speech in Lok Sabha Modi Mantra to Share Market Investers)

PM मोदी म्हणाले, "विरोधकांनी सरकारी कंपन्यांबाबत अनेक आरोप केले तरी देखील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) आपलं सर्वाधिक महसुलाचं रेकॉर्ड केलं आहे. एचएएल सध्या देशाचा अभिमान म्हणून उदयाला येत आहे. त्याचबरोबर एलआयसीबाबतही विरोधकांनी आरोप केले. (Latest Marathi News)

एलआयसी बुडणार असल्याचं त्यांनी म्हटलं पण ही सरकारी कंपनी देखील मजबूत होत आहे. शेअर मार्केटवाल्यांसाठी हा मंत्र आहे की, ज्या कोणत्या सरकारी कंपनीला विरोधक शिव्या देतील. त्याच्यावरच तुम्ही दावं लावा सर्वकाही चांगलचं होणार आहे" (Marathi Tajya Batmya)

मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

देशातील ज्या ज्या संस्थांना हे लोक मृत घोषित करतात, त्या संघटना भाग्यवान ठरतात. ज्या पद्धतीने ते देश आणि लोकशाहीला शिव्याशाप देत आहेत, त्यामुळे देश आणि लोकशाही आणखी मजबूत होणार आहे, असा मला विश्वास आहे. आम्हीही मजबूत होणार आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टार्गेट केलं.

जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही आमची अर्थव्यवस्था पुढील 5 वर्षात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू, तेव्हा एका जबाबदार विरोधी पक्षाने आम्ही ते कसे करणार? असे प्रश्न विचारायला हवेत. पण आता हे पण मला त्यांना शिकवावं लागणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर बरसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT