नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी घेतलेल्या ताब्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी इतर देशांमध्ये शरण घेण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. तर दुसरीकडे अशा कठीण परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये अनेक भारतीय नागरिक देखील अडकून पडले आहेत. अफगाणिस्तमधील सद्यपरिस्थितीचे भारतावरही वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सध्या उच्चस्तरीय बैठक झाली.
सीसीएस म्हणजेच कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची (Cabinet Committee on Security - CCS) ही बैठक असून पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या ७ लोक कल्याण मार्ग येथे ही बैठक सुरु होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या बैठकीला उपस्थित होते.
सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या आज झालेल्या बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना येत्या काळात अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान म्हणाले की, "भारताने फक्त आपल्या नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे असे नाही, तर आपण भारतात येऊ इच्छिणाऱ्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांना आश्रय दिला पाहिजे. आपण आपल्या अफगाण बांधवांना आणि बहिणींनाही शक्य ती सर्व मदत केली पाहिजे.
वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती आणि येऊ घातलेली राजकीय परिस्थिती याबद्दल तपशीलवार माहिती सीसीएसला देण्यात आली. सीसीएसला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचं, भारतीय समुदायाच्या काही सदस्यांचं आणि पत्रकारांचं स्थलांतर याबद्दल माहिती देण्यात आली.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि राजदूत रुद्रेंद्र टंडन उपस्थित होते. राजदूत टंडन हे काबूलहून बाहेर काढण्याच्या फ्लाइटवर होते जे आज लवकर जामनगरमध्ये दाखल झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.