PM Modi Pune Visit esakal
देश

PM Modi Pune Visit : मोदींचा पुणे दौरा प्रत्येक वेळी गाजतो पगडीमुळे , जाणून घ्या यावेळच्या पगडीची वैशिष्ट्ये

पुण्याकडून आजवर मिळालेल्या पगड्यांबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

साक्षी राऊत

PM Modi Pune Visit : पीएम मोदी आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आणि पुण्यातील इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यात आले आहेत. मोदींचा हा तिसरा पुणे दौरा आहे. मोदींचा प्रत्येक पुणे दौरा हा खास ठरला आहे. मोदींचा प्रत्येक पुणे दौरा गाजतो तो त्यांच्या पगडीमुळे. त्याना पुण्याकडून आजवर मिळालेल्या पगड्यांबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

मागल्या वर्षी पुण्यातील देहू येथे जगद्गुरू तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पीएम मोदी पुण्यात आले होते. या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वारकरी मंडळींची उपस्थिती होती. या लोकार्पण सोहळ्यात तुकोबांची पगडी आणि माऊलींची मूर्ती पीएम मोदींचा भेट देण्यात आली होती. पुण्यातील देहू या तिर्थस्थळाला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान होते.

पंतप्रधान मोदींचा ६ मार्च २०२२ चा पुणे दौरा

पंतप्रधान मोदी ६ मार्चला २०२२ पुणे दौऱ्यावर होते. पुणे मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेनुसार मुरूडकर फेटेवाले यांच्याकडून शाही फेटा बनवण्यात आला होता.

हा शाही फेटा रेशमी कापडापासून तयार करण्यात आला होता. यासाठी मुरूडकर आणि त्यांचे सहकारी आठवड्याभरापासून तयारी करत होते. या फेट्यावर शिवमुद्रा लावण्यात आली होती. मात्र नंतर काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले होते. शिवमुद्रा पगडीवरून काढून टाकण्याची मागणीही झाली होती. या फेट्यात खास एअर वेंटिलेशनचीही व्यवस्था करण्यात आली होती. हा फेटा खास मोदींसाठी तयार करण्यात आला होता. (Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या व्यासपीठावरही पीएम मोदींना टिळक पगडी प्रदान करण्यात आली. टिळक पगडी ही पुण्याची शान मानली जाते. अशाप्रकारे मोदींचा प्रत्येक पुणे दौरा हा त्यांना भेट म्हणून देण्यात आलेल्या पगडीमुळे गाजला आहे. टिळक ज्याप्रमाणे पगडी घालायचे अगदी तशाच पद्धतीची पगडी पीएम मोदींना देण्यात आली. पीएम मोदींची लाल रंगाची चकाकणारी पगडी आणि त्याला मोत्यांच्या माळांनी सजवलंय. ही पगडी पुण्याचा मान आणि शान म्हणून ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी घडवलं सुसंस्कृतपणाचं दर्शन; चुलते श्रीनिवास पवार यांचे घेतले आशिर्वाद

Maharashtra Vidhan Sabha Voting Percentage Update: सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा? व्हायरल पत्राने कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापलं! नेमकं काय घडलं?

UGC NET Exam December 2024: यूजीसीचं अधिसूचना जाहीर, जाणून घ्या परीक्षा वेळापत्रक

Maharashtra Assembly Election 2024 : Sachin Tendulkar आणि अजिंक्य रहाणेने बजावला मतदानाचा हक्क; कर्तव्य पुर्ण करण्याचे केले मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT