PM Modi Said would have taken back Kartarpur Sahib in 1971 from Pakistan Slam Congress AAP Lok sabha Election 2024  
देश

Lok Sabha Election 2024 : "...तर कर्तारपूरसाहिब घेतले असते"; पंजाबमधील सभेत पंतप्रधान मोदींचा मोठा दावा

मी जर देशाचा पंतप्रधान असतो तर पाकिस्तानी सैनिकांची मुक्तता करण्याच्या बदल्यात कर्तारपूर साहिब ताब्यात घेतले असते, असा दावा त्यांनी येथील सभेमध्ये बोलताना केला.

सकाळ वृत्तसेवा

पतियाळा (पंजाब), ता.२३ (वृत्तसंस्था) : पंजाबमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्यावेळी (१९७१) मी जर देशाचा पंतप्रधान असतो तर पाकिस्तानी सैनिकांची मुक्तता करण्याच्या बदल्यात कर्तारपूर साहिब ताब्यात घेतले असते, असा दावा त्यांनी येथील सभेमध्ये बोलताना केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘ बांगलादेश युद्धाच्यावेळी आमच्याकडे ९० हजार पाकिस्तानी सैनिक होते. हुक्मी एक्का आपल्या ताब्यात होता. त्यावेळेस जर मोदी असता त्या सैनिकांची मुक्तता करण्याच्या बदल्यात कर्तारपूर साहिबवर दावा सांगितला असता. वंचित घटकांना न्याय देण्यासाठीच आपण नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला होता. हे काही मतांसाठी केले नव्हते. ‘इंडिया’ आघाडीसाठी मतपेढीचे लांगुलचालन हे सर्वांत मोठे लक्ष्य आहे.

ज्या दलित आणि शीख बंधू भगिनींना फाळणीचे दुःख सहन करावे लागले त्यांना न्याय देण्यासाठी आपण ‘सीएए’ आणत आहोत. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी मात्र ‘सीएए’ला विरोध केला आहे. ते सत्तेमध्ये आले तर ‘सीएए’ही रद्द करतील.’’ फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागणाऱ्या शिखांना भारतीय नागरिकत्व देणे अयोग्य आहे का? हे तुम्हीच मला सांगा, असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला. ‘पंजा’ आणि ‘झाडू’ हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत पण त्यांचे दुकान मात्र एक आहे असे त्यांनी सांगितले.
B

त्यांनी अण्णा हजारेंना धोका दिला

‘‘ज्यांनी गुरूंना धोका दिला ती मंडळी कधीच पंजाबचा विकास घडवून आणू शकत नाही. पंजाबमध्ये दिल्लीतील कट्टर भ्रष्टाचारी पक्ष सत्तेमध्ये आहे तर दुसरा पक्ष शीखविरोधी दंगलींचा दोषी आहे. ‘पंजा’ आणि ‘झाडू’ हे दोन वेगळे पक्ष असले तरीसुद्धा त्यांचे दुकान मात्र एक आहे. आता ही मंडळी कसल्याही प्रकारची वक्तव्ये करत असली तरीसुद्धा दिल्लीमध्ये परस्परांना खांद्यावर घेऊन नाचत आहेत. पंजाबमधील जनतेने त्यांच्यापासून दूर राहायला हवे. जी मंडळी त्यांचे गुरू अण्णा हजारे यांना धोका देऊ शकतात तीच दिवसातून दहावेळा खोटे बोलू शकतात. ही मंडळी पंजाबचा विकास घडवून आणू शकत नाही तसेच मुलांच्या भविष्यासाठी देखील काही करू शकत नाही,’’ असे मोदी यांनी सांगितले.

ते कुणालाही धोका देऊ शकतात

‘‘अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आले पण इंडियावाली मंडळी त्याचा द्वेष करू लागली. ही मंडळी टोकाची जातीयवादी, घराणेशाहीवादी राजकीय मानसिकतेची आहेत. सत्तेसाठी ते कुणालाही धोका देऊ शकतात. याच काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले त्यामुळे मागील सत्तर वर्षांपासून आपण कर्तारपूरसाहिबला भेट देऊ शकलेलो नाहीत,’’ असे मोदी यांनी सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे कागदी असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT