मोदींना पंजाबचा दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला जावं लागलं होतं. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल कऱण्यात आली असून आज सुनावणी होणार आहे.
दिल्ली - पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये (Firozpur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या. यामुळे मोदींना पंजाबचा दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला जावं लागलं होतं. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल कऱण्यात आली असून आज सुनावणी होणार आहे. वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा आणि न्यायाधीश सूर्यकांत, हेमा कोहली या तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर याची सुनावणी होईल.
लॉयर्स व्हॉइस या संघटेच्यावतीने याचिका दाखल कऱण्यात आली असून यात म्हटलं आहे की, पंतप्रधानांची सुरक्षा भेदणं हा फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, हा एसपीजी अधिनियमाच्या अंतर्गत येतो. पंतप्रधानांची सुरक्षा भेदली जाणे ही राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक झालेली चूक होती. या चुकीसाठी पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
वकील मनिंदर सिंह यांनी याआधी गुरुवारी मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी ही गंभीर चूक असून सर्वोच्च न्यायालयात हे सांगत चौकशीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची एक प्रत पंजाब सरकारला देण्याचंही याचिकाकर्त्याला सांगितलं. मनिंदर सिंह यांनी म्हटलं होतं की, पंजाब सरकारकडून पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला रस्त्यावर अडवू देणं ही गंभीर चूक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.