PM Modi Security Breach Video Viral Team eSakal
देश

PM Modi समर्थकांनीच अडवला ताफा? व्हिडीओमुळे निर्माण झाला प्रश्न

PM Modi Security Breach : किसान एकता मोर्चाने यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आणला आहे.

सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फिरोजपूर दौरा सुरक्षेतील मोठ्या त्रुटींमुळे रद्द करण्यात आला. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळं पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. (PM Modi Security Breach) या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. एवढेच नाही तर भाजपने सत्ताधारी काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात घोळ आणि सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचा आरोप केला आहे. मात्र आता या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतानाच एक व्हिडीओ किसान एकता मोर्चाने शेअर केला आहे. (PM Modi Security Breach Video Viral)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ भाजप कार्यकर्त्यांनीच घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडीओ किसान एकता मोर्चाने शेअर केला आहे. यामध्ये काही लोक हातात भाजपचा ध्वज घेऊन, गळ्यात भाजपचा गमछा घालून उभे आहेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात घोषणा देत आहेत.

नवाब मलिक यांनी एका व्हिडीओचे ट्विट रिट्वीट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक राज्यामध्ये सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच आयबीचे डेप्यूटी डायरेक्टर अथवा संयुक्त डायरेक्टर रँकचे ऑफिसर तैनात असतात. पंजाबच्या आयबी अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत आधीच माहिती मिळाली नव्हती का? या व्हिडीओमध्ये पाहा आंदोलनकर्ते घोषणा देत मोदींच्या किती जवळ गेले आहेत. असं या व्हिडीओला ट्विट करणाऱ्या व्यक्तीने लिहलं आहे. (Nawab Malik Retweet Video)

हा व्हिडीओ रिट्विट करत नवाब मलिकांनी विचारलंय की, आंदोलकांनी भाजपचा झेंडा का धरला आहे? हे लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी घोषणा देणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती भाजपचा झेंडा घेऊन उभा असलेला दिसून येतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT