narendra modi security sakal
देश

'मोदींच्या दौऱ्याआधीच पंजाब पोलिसांना होती आंदोलनाची माहिती'

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Security Breach Investigation : पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजप पंजाब सरकारवर हल्लाबोल करत आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत, नेमकं पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटीबद्दल जबाबदार कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे आंदोलक शेतकऱ्यांनी उड्डाणपूल रोखून धरला यामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग झाल्यामुळे भाजपने पंतप्रधान मोदींचा जीव धोक्यात आणल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे, तर काँग्रेसने सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था केल्या होत्या असे सांगितले. दरम्यान हे प्रकरण आता चौकशीचा विषय आहे.

दरम्यान, इंडिया टुडे दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच परिसरातील स्थानिकांशी संवाद साधला आणि त्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी अनेक गंभीर बाबीचा खुलासा केला आहे.

या रिपोर्टमध्ये फिरोजपूरचे पोलीस उपअधीक्षक सुखदेव सिंग यांची भेट घेत त्यांना पंतप्रधान मोदींच्या नियोजित रॅलीपूर्वी काय घडले याचा अंदाज लावण्यात राज्य गुप्तचर यंत्रणा कशी अयशस्वी ठरली, असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, आंदोलकांबाबत तसेच महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक रोखण्यासाठी आणि तसेच भाजप कार्यकर्त्यांना देखील पंतप्रधानांचा रस्त्या अडवण्यापासून रोखण्याबाबतचा अहवाल 2 जानेवारीला अतिरिक्त पोलिस महासंचालकांना पाठवण्यात आला होता. तसेच २ जानेवारीच्या अहवालानंतरही, आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना सतत अपडेट केले की, आंदोलक पंडालमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील आणि जर पोलिसांनी त्यांना रोखले तर ते रस्त्यावरच धरणे देतील असे त्यांनी पुढे सांगितले.

सुखदेव सिंग यांना विचारले की, पोलिसांना आंदोलन करणाऱ्यांचा प्लॅन आधीच माहिती असताना आंदोलक रस्त्यावर कसे जमले? त्यावर त्यांनी सांगितले की 'बलदेव सिंग झिरा गट - भारतीय किसान युनियन क्रांतीकारी' यांनी एकत्र गोळा होण्याची योजना यापूर्वीच आखली होती. मी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना याबद्दल माहिती दिली.

आंदोलकांनी मोर्चा काढून बॅरिकेड्स तोडले. त्यांनी नाकेबंदी केली तेव्हा आम्ही पुन्हा माहिती दिली, असे सुखदेव सिंग म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, 2, 3 आणि 4 जानेवारी रोजी अतिरिक्त पोलीस महासंचालक नागेश्वर राव आले होते. मी त्यांना रस्ते अडवले जाण्याबद्दल एक पत्र दिले होते.

त्या दिवशी नेमकं काय झालं

५ जानेवारीला पीएम मोदी हेलिकॉप्टरने फिरोजपूरला जाणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा ताफा रस्ते मार्गाने निघाला. राज्य अधिकार्यांना विशेष संरक्षण गटाकडून हे सांगण्यात आले की खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदींना रस्त्याने प्रवास करावा लागू शकतो आणि त्यामुळे रस्ता सील करणे आवश्यक आहे. तरी पंतप्रधानांच्या प्रवासाच्या दिवशी, पोलिस कर्मचार्‍यांकडून आंदोलनासंबंधी गुप्त माहितीची देवाणघेवाण केली जात होती. तरीही रस्ता मोकळा झाला नाही.

डीएसपी सुखदेव सिंग म्हणाले की, त्यांनी आंदोलकांच्या हालचालींबाबत वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना संदेश पाठवला होता. त्यांनी पुढे सांगितले की, सकाळी 11.45 वाजता आंदोलक एकत्र आले आणि मोगा रोडकडे जाऊ लागले. हा संदेश रात्री 12.07 वाजता पाठवण्यात आणि वाचण्यात आला. 12.20 वाजता, फिरोजशाह बॅरिकेड तोडण्यात आले ते त्याच मार्गाने जात होते ज्यावरून मोदी येत होते. हा मेसेज दुपारी 12.32 वाजता पाठवण्यात आला. दुपारी 12.45 वाजता सुखदेव सिंग यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना कळवले की 200-225 आंदोलकांनी व्हीव्हीआयपी मार्ग रोखला होता.

डीएसपी सुखदेव सिंग यांनी असेही सांगितले की, 'फ्रिंज ग्रुप शिख्स फॉर जस्टिस'ने पंजाब दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्यावर जोडा फेकणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आमच्याकडे हे इनपुट 4 जानेवारी रोजी होते असेही त्यांनी सांगितले.

फिरोजपूरमधील कुलगढ़ी पोलिस ठाण्यात स्टेशन हाऊस ऑफिसर बिरबल सिंग यांनी असे सांगितले की, काही लोक चिडलेल होते आणि ते एकत्र जमले होते. ती त्यांची जागा आणि त्यांचा अधिकार होता, त्यात आम्ही काय करू शकतो? सरकारने आम्हाला त्यांना मारहाण करण्याचा आदेश दिलेले नव्हते

बिरबल सिंग यांना जर पोलिसांनी त्यांना आदेश दिले असते तर त्यांनी काय केले असते असे विचारले असता ते म्हणाले, “जर आम्हाला लाठीमार, अश्रुधुराच्या गोळ्या किंवा फायरींग करुन त्यांना पांगवण्याचे आदेश दिले असते तर आम्ही त्यांना पांगवू शकलो असतो. पण निवडणुका येत आहेत त्यामुळे आम्ही बळाचा वापर करू शकलो नाही.”

तसेच त्यांनी केला की आंदोलकांचा गर्दी अचानक जमली आणि त्यांच्यात सुसंवाद नव्हता ज्यामुळे त्यांना आंदोलनाची माहिती नव्हती. 5 जानेवारी रोजी फिरोजपूर येथे जमलेले आंदोलक शेतकरी नसून “शेतकऱ्यांच्या वेषातील कट्टरपंथी” असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रोटोकाल पाळला गेला नाही

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या प्रोटोकॉलचे उघड-उघड उल्लंघन करून, व्हीव्हीआयपींचा दौरा असूनही 5 जानेवारीला पंतप्रधान मोदींचा ताफा जेथे थांबला होता, त्या फ्लायओव्हरजवळील बाजार गजबजलेला होता. बाजारपेठेत अवैध दारूचे दुकानही सुरू होते. अशी माहिती दुकानदार बिकीर यांनी दिली. 5 जानेवारी रोजी ते त्याठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचे दुकान उघडे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलक हे सर्व बाहेरचे होते आणि परिसरातील लोक नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ग्रामस्थांनी रस्ता अडवण्याचे आवाहन

5 जानेवारी रोजी जवळच्या प्यारेगाव गावच्या सरपंच यांनी सांगितले की, आंदोलकांनी स्थानिकांना नाकाबंदीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सरपंच निछत्तर सिंह म्हणाले की, आंदोलकांनी गुरुद्वारामध्ये मेसेज पाठवून लोकांना एकत्र येण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या दहा मिनिटे आधी त्यांनी रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत मागितली. इथल्या किसान संघटनांनी गर्दीची जमवली होती. ते पुढे म्हणाला, त्या दिवशी हातात लाठ्या घेऊन दोन तरुण धावत आले आणि त्यांनी सर्वांना बोलावले. सध्या या सर्व प्रकाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील तपास सुरु असून तो पुर्ण झाल्यावरच सत्य पूर्णपणे उघड होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT