पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू आहेत. नेत्यांचे दौरे आणि प्रचार कार्यक्रम देखील जोरात सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, काल त्यांनी उत्तराखंड (Uttarakhand), सहाहनपूर आणि गोव्यात (Goa) मतदारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उत्तराखंडमध्ये बोलताना मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
उत्तराखंडच्या श्रीनगर येथील सभेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिवंगत जनरल बिपिन रावत यांना गुंड म्हणून उल्लेख करणारे काँग्रेसचे नेते आज त्यांच्याच नावावर मत मागत असल्याबद्धल मोदी यांनी टीका केली. श्रीनगरच्या एनआयटी उत्तराखंड मैदानावर सकाळी सभा झाली. ते म्हणाले की, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे प्रामाणिक लोकांची इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या आशीर्वादाने निवडणूक आयोग आणि हवामानामुळे मला आपले दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. काँग्रेस पक्षाने जनरल बिपिन रावत यांना अपमानित केले होते. आज तेच प्रचारात त्यांचा कटआऊट वापरत आहेत. फोटो लावत मतांची मागणी करत आहेत. खुर्चीसाठी एखाद्याची नीतिमत्ता एवढी ढासळू शकते, यावर माझा विश्वास बसत नाही.
उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु मणिपूरच्या निवडणूका आयोगासाठी आणि पोलिस प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. मणिपूरची भौगोलिक स्थितीबरोबरच सक्रिय बंडखोर संघटना डोकेदुखी आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये फेरबदल केला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी २७ फेब्रुवारीऐवजी २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ मार्चऐवजी ५ मार्चला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.