नवी दिल्ली: एकीकडे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून संपूर्ण जग या युद्धाबाबत चिंतीत आहे. याबाबत काही ना काही ठोस भूमिका घेणे प्रत्येक देशासाठी गरजेचं ठरलं आहे. दुसरीकडे आज क्वाड लीडर्सची बैठक होणार आहे. यामध्ये या युद्धासंदर्भात काय चर्चा केली जातेय का हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. या बैठकीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशांच्या प्रमुखांसमवेत सहभागी होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida ) यांच्यासमवेत आज क्वाड लीडर्सच्या व्हर्च्यूअल बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. (Narendra Modi) या बैठकीमध्ये ते इंडो-पॅसिफिकमधील महत्त्वाच्या चर्चा करणार आहेत. क्वाड लीडर्स या बैठकीमध्ये क्वाडच्या अजेंडाचा भाग म्हणून घोषित केलेल्या बाबींसाठी झालेल्या प्रयत्नांचा देखील आढावा घेणार आहेत. क्वाड या संघटनेतील हे चार देश हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता कायम रहावी आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रयत्नशील असतात. रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आणि त्याचं सावट या भागावर पडू नये, तसेच या परिस्थितीत कशी भूमिका घ्यावी, याबाबत चर्चा होऊ शकते.
काय आहे क्वाड परिषद?
क्वाड परिषद म्हणजे अमेरिका-ऑस्ट्रेलिया-भारत आणि जपान या चार राष्ट्रांनी मिळून बनलेला समूह आहे. चार राष्ट्रांनी सुरक्षाविषयक संवादासाठी स्थापन केलेला हा एक राष्ट्रांचा गट आहे. म्हणूनच त्याचं नाव क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग अर्थात क्यूएसडी म्हणजेच चतुष्कोनी सुरक्षा संवाद आणि त्याचंच छोटं रूप म्हणजे क्वाड होय. क्वाड या संघटनेतील हे चार देश हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता कायम रहावी आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रयत्नशील असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.