PM Modi Viral Video : देशातील पहिला नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. सोशल मीडियावर हिट झालेल्या सर्व कंटेंट क्रिएटर्सना पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. वैदिक ज्योतिष आणि प्राचीन भारतीय ज्ञानाच्या क्षेत्रात मोठं नाव कमवलेल्या अरिदमन यांना देखील पुरस्कारही देण्यात आला. त्यांना सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर अवॉर्ड मिळाला.
दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. यामध्ये त्याने सांगितले की, जेव्हा तो ट्रेनमध्ये प्रवास करायचे तेव्हा सीटवर बसण्यासाठी लोकांचे हात पाहू लागत असतं, जेणेकरून लोक त्यांना सीटवर बसण्यासाठी जागी द्यायचे.
पुरस्कार देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी माझ्या लहानपणीचा अनुभव सांगतो. मी खूप प्रवास करायचो. कधीच रिझर्व्हेशन नसायचे. खूप गर्दी असे, मी रिझर्व्ह डब्यातून प्रवास करायचो. तेव्हा मी बघायचो की, इथे थोडी संधी आहे, मग मी कोणाचा तरी हात पकडून बघू लागायचो. यानंतर लोक माझ्यासाठी बसाण्याची व्यवस्था करायचे. पंतप्रधान मोदींच्या बालपणीचा किस्सा सांगितल्यानंतर तिथे उपस्थित सर्व क्रिएटर्सना हसू आवरता आले नाही.
पंतप्रधान मोदी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ शेअर करत काँग्रसकडून खोचक टीका कण्यात आली आहे. या व्हिडीओ सोबत साहेब लहानपणी जागाला मूर्ख बनवण्याची कला शिकले होते, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला त्यांनी साहेब 'ज्योतिष' भी है.. असं कॅप्शन दिलं आहे.
कंटेंट क्रिएटर्सनी 'क्रिएट ऑन इंडिया मुव्हमेंट' सुरू करावी आणि भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरांवरील कथा जगासोबत शेअर कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमादरम्यान केलं.
यावेळी गायिका मैथिली ठाकूर हिला 'कल्चरल अॅम्बेसेडर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टेक कॅटेगरीमध्ये गौरव चौधरी आणि बेस्ट ट्रॅव्हल मेकरचा पुरस्कार कामिया जानी यांना मिळाला.
कोणत्या क्रिएटरला कोणत्या पुरस्कार मिळाला?
जया किशोरी - सामाजिक परिवर्तनासाठी सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार
कविता सिंग (कबिताचे किचन) - फूड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार
ड्रू हिक्स - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय निर्माता पुरस्कार
कामिया जानी - फेव्हरेट ट्रॅव्हल क्रिएटर अवॉर्ड
रणवीर अल्लाबदिया (बीरबायसेप्स) - डिसप्टर ऑफ द इयर अवॉर्ड
RJ Raunac (Bauaa) - मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर-मेल पुरस्कार
श्रद्धा - मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (महिला) पुरस्कार
अरिदामन - सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर पुरस्कार
निश्चय - गेमिंग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार
अंकित बैयनपुरिया - सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस निर्माता पुरस्कार
नमन देशमुख - शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार
जान्हवी सिंग - हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार
मल्हार कळंबे - स्वच्छता दूत पुरस्कार
गौरव चौधरी - टेक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार
मैथिली ठाकूर - कल्चरल ॲम्बेसेडर ऑफ द इयर पुरस्कार
पंक्ती पांडे - फेव्हरेट ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड
कीर्तिका गोविंदासामी - सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार
अमन गुप्ता - सेलिब्रिटी क्रिएटर अवॉर्ड प्रदान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.