National Emblem cast the New Parliament Building 
देश

संसदेच्या नव्या इमारतीवर ६.५ मीटरचा अशोक स्तंभ, PM मोदींनी केलं उद्घाटन

हा अशोक स्तंभ पितळेचा असून तो दुरूनच दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हा अशोक स्तंभ पितळेचा असून तो दुरूनच दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या छतावर ६.५ मीटर उंच अशोकस्तंभ बांधण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. हा अशोक स्तंभ पितळेचा असून तो दुरूनच दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. (National Emblem cast the New Parliament Building)

दरम्यान, अशोक स्तंभाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी काम करत असणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राय आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरीही उपस्थित होते. अशोक स्तंभाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ उभे राहून फोटो काढताना दिसत होते.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती अशी की, हा अशोकस्तंभ तयार करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्याची रचना 9, 500 किलो वजनाची आणि 4.4 मीटर रुंद आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या छताच्या मध्यभागी हा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभाला आधारासाठी ६५०० किलो स्टीलची रचनाही तयार करण्यात आली आहे. या स्तंभाच्या उभारणीचे काम 8 टप्प्यांत पूर्ण करण्या आले आहे. कॉन्सेप्ट स्केच, क्ले मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स अशा एकूण 8 फेऱ्यांमध्ये ते तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, हा अशोक स्तंभ एकूण 150 भागांमध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर हे भाग एकत्र करुन त्यांना छतावर बसवण्यात आले आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आणि ते पूर्ण होण्यासाठी याला दोन महिन्यांचा कालवधी लागला आहेत. नवीन संसद भवनाच्या इमारतीचे कामही वेगाने सुरू आहे. त्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आधीच्या इमारतीपेक्षा वेगळ्या असणार आहेत. नवीन संसद भवनाच्या रचनेतही भारतीय वास्तुकलेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT