PM Modi Mann Ki Baat  
देश

Mann Ki Baat : प्रत्येकाने आईच्या नावाने एक झाड अवश्य लावावे; 'मन की बात'मध्ये PM मोदी यांचे आवाहन

PM Modi Mann Ki Baat : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(एनडीए) केंद्रात तिसऱ्यांदा सरकार सत्तेत आल्यानंतर मोदी यांचा हा ‘मन की बात' चा पहिलाच कार्यक्रम होता.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. ३० ः पर्यावरण बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा स्थितीत धरणी मातेला वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड अवश्य लावावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(एनडीए) केंद्रात तिसऱ्यांदा सरकार सत्तेत आल्यानंतर मोदी यांचा हा ‘मन की बात' चा पहिलाच कार्यक्रम होता. ‘टी-२०’ विश्‍व करंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास शुभेच्छा देताना मोदी यांनी आॅलिंपिक स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू नक्कीच सरस कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी २५ फेब्रुवारी रोजी ‘मन की बात’ चा शेवटचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी मी पुन्हा भेटेन, असे सांगितले होते, असा उल्लेख करत मोदी म्हणाले, ‘‘देशाची राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेवर लोकांनी विश्वास दाखविला आहे. अलीकडे पार पडलेली लोकसभा निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. कोट्यवधी लोकांनी या निवडणुकीत मतदान केले. आजचा दिवस म्हणजे ३० जून हा आदिवासी लोकांच्या जीवनात खूप महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी आदिवासी लोकांनी इंग्रजांविरोधात आवाज उठविला होता. १८५७ च्या आधी ही क्रांती झाली होती आणि त्या क्रांतीत झारखंडच्या आदिवासी वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.’’

कार्थुम्बीचा उल्लेख


केरळमध्ये बनणाऱ्या विशेष प्रकारच्या रंगीबेरंगी छत्र्यांचा उल्लेख मोदी यांनी केला. केरळमधील अट्टापडी येथे ‘कार्थुम्बी’ नावाच्या विशेष छत्र्या बनवल्या जातात. देशभरातून या छत्र्यांची मागणी वाढली आहे. वट्टालक्की सहकारी कृषी समितीच्या देखरेखीखाली या छत्र्या बनवल्या जातात. ‘वोकल फॉर लोकल’चे हे आदर्श उदाहरण आहे, असे मोदी यांनी नमूद केले. ‘‘तुर्कमेनिस्तान मध्ये मे महिन्यात कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते. हा गुरुदेवांचा सन्मान आहे,’’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी मी स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या कार्यक्रमास हजर होतो, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT