PM Modi America Visit google
देश

PM Modi US Visit : PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला काय मिळेल? जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा २१ जूनपासून सुरू होत आहे. पीए मोदींचा हा दौरा देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. भारत आणि अमेरिकाच नाही तर जगभरातील अनेक देशांच्या नजरा या दौऱ्याकडे लागल्या आहेत.

पाकिस्तान आणि चीन हे देश देखील या दौऱ्यावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यातून भारताला कय फायदा होणार आहे? तसेच या दौऱ्यामुळे पाकिस्तान आणि चीन या देशांना पोटदुखी का होतेय? चला जाणून घेऊया सविस्तर...

मोदींच्या या दौऱ्यातून भारताला काय मिळेल?

आंतरराष्ट्रीय स्तरावर ताकद वाढणार -

जगातील मोठ्या देशांपैकी भारत हा एकमेव देश आहे जो कोणत्याही एका गटात सामिल नाही. असे असूनही प्रत्येक गटाचा आवडता देश आहे. भारताचे रशियाबरोबरच अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत. भारत एक जागतिक महासत्ता म्हणून वेगाने उदयास येत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर अमेरिकेला जात आहेत.

मोदींची ही राजकीय भेट महत्वाची आहे कारण या दौऱ्याचा पूर्ण खर्च यजमान देश करतो. २१ जून रोजी योग दिनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी भारतीय संस्कृती जगभर पोहोचवतील. यानंतर त्यांची जो बिडेन यांच्याशी भेट होईल.

या बैठकीत भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक धोरणात्मक भागीदारी देखील घट्ट होणार आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, अंतराळ मोहीम, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये करार होणार आहेत. यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद झपाट्याने वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रातील साहित्याच्या खरेदीबाबतही दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो.

इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्राबाबत चर्चा होणार-

पॅसिफिक प्रदेश आशियाला पश्चिमेकडील देशांशी जोडतो. येथे ५० हून अधिक लहान देश आणि बेटे आहेत. या भागात चीनचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पांतर्गत पापुआ न्यू गिनीजवळील सोलोमन बेटांसोबत सुरक्षा करारावर स्वाक्षरी केल्यानंतर चीनने राजधानी होनियारा येथे बंदर बांधण्याचे कंत्राट मिळवले आहे.

चीनच्या या हालचाली पाहता पापुआ न्यू गिनी चीनकडे वळत असल्याच्या चर्चा आहेत, हे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्वाड ग्रुपसाठी मोठी चिंतेची बाब आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी २०२२ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बँकॉकमध्ये भेट घेतली होती, तेव्हापासून चीन आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही चांगले मित्र आहेत.

आता पाश्चिमात्य देशांनी इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्रातील देशांना एकत्र करण्यासाठी भारताला पुढे केले आहे. भारताचे पीएम मोदी हे काम करत आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले तेव्हा तेथील पंतप्रधानांनी पीएम मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे स्वागत केले.

याशिवाय, भारतीय पंतप्रधान प्रथमच इंडिया पॅसिफिक आयलंड को-ऑपरेशन अर्थात FIPIC च्या फोरममध्ये सामील झाले. याद्वारे त्यांनी भारतीय क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींना रोखण्याच्या दिशेने पहिले आणि मोठे पाऊल उचलले. पॅसिफिक क्षेत्रातील देश आणि बेटांनी पंतप्रधान मोदींचे ज्या प्रकारे स्वागत केले, त्यामधून देखील एक राजकीय संदेश देण्यात आला.

आता अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात या विषयावर चर्चा होणार आहे. अमेरिकेची इच्छा आहे की पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक महासागर क्षेत्रासह इतर आशियाई देशांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व करावे. त्यामुळे चीनचा प्रभाव कमी होऊ शकतो.

मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची शक्यता -

पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्यात अमेरिकेतील अनेक बड्या उद्योगपतींना भेटणार आहेत. उद्योगपतींसोबतच्या बैठकीत भारतात गुंतवणुकीबाबतही चर्चा होणार आहे. या काळात मायक्रोन टेक्नॉलॉजी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा करू शकते, असे सांगितले जात आहे.

जगभरात भारताच्या वाढत्या प्रभावामुळे चीन आणि पाकिस्तान पूर्वीपेक्षा जास्त चिंतेत आहेत, सध्या पाकिस्तानला वेगवेगळ्या समस्याने जखडले आहे तरतीन देखील सत्त कुठल्यातरी वादात अडकलेला आहे. यादरम्यान भारत मात्र झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. यामुळे दोन्ही देश काळजीत पडले आहेत. भारताचा विकास झाला तर आपलं महत्व कमी होईल असा या देशांचा समज आहे असे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ सांगतात.

असा असेल पीएम मोदींची दौरा (PM Modi US Visit Schedule) -

  • २१ जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील.

  • २२ जून रोजी पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

  • २२ जूनच्या संध्याकाळी, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या स्टेट डिनरला उपस्थित राहतील.

  • २२ जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.

  • २३ जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करतील.

  • पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ, व्यावसायिक आणि इतर भागधारकांशी संवाद साधतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT