Underwater Metro Kolkata: देशातील पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रो आज कोलकाता शहरातून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. (pm modi will inaugurate country first underwater metro section kolkata know specialties )
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो विभागाचे उद्घाटन करणार आहेत. पाण्याखालील मेट्रो बोगदा हा हुगळी नदीच्या खाली 16.6 किलोमीटर पसरलेला अभियांत्रिकीचा मोठा प्रकल्प आहे. अंडरवॉटर मेट्रो हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक शहराला जोडेल. यात 6 स्थानके असतील, त्यापैकी तीन भूमिगत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांना पाण्याखालील मेट्रोचा आनंद घेता येणार आहे.
या मेट्रोचे वैशिष्ट म्हणजे यात 10.8 किमी भाग भूमिगत आहे. हा भारतातील अशा प्रकारचा पहिला वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला घेत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती.
या प्रकल्पाच्या 10 खास गोष्टी
1 - कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेनेड सेक्शन खूप खास आहे, कारण या सेक्शनमध्ये ट्रेन पाण्याखाली धावणार आहे. हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल स्टेशन देखील आहे.
2- हावडा मैदान-एस्प्लेनेड विभाग हुगळी नदीच्या खाली बांधला गेला आहे, हावडा आणि सॉल्ट लेक शहरे हुगळी नदीच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर वसलेली आहेत.
3- एप्रिल 2023 मध्ये, कोलकाता मेट्रोने ट्रायल म्हणून हुगळी नदीखालील बोगद्यातून ट्रेन चालवून इतिहास रचला, जो भारतात पहिल्यांदाच घडला.
4- हा मार्ग 4.8 किलोमीटर लांबीचा आहे. जो हावडा मैदान ते एस्प्लेनेडला जोडेल. या विभागात, हावडा मैदान पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत सॉल्ट लेक सेक्टर V शी जोडले जाईल.
5- हुगळी नदीखालचे 520 मीटर अंतर ही मेट्रो अवघ्या 45 सेकंदात पार करेल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
6- एस्प्लेनेड आणि सियालदाह मधील पूर्व-पश्चिम संरेखनचा भाग अद्याप बांधकामाधीन आहे. सॉल्ट लेक सेक्टर V ते सियालदह पर्यंतचा रस्ता आधीच वापरात आहे.
7- मेट्रो ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन (ATO) प्रणालीद्वारे धावेल. म्हणजेच मेट्रो चालकाने एक बटण दाबल्यानंतर ट्रेन आपोआप पुढील स्थानकावर पोहोचेल.
8- पूर्व-पश्चिम मेट्रोच्या एकूण 16.6 किलोमीटरपैकी 10.8 किलोमीटर भूमिगत आहे, ज्यामध्ये हुगळी नदीखालील बोगद्याचाही समावेश आहे. उर्वरित भाग जमिनीच्या वर आहे.
9- कोलकाता मेट्रोचे लक्ष्य जून किंवा जुलैच्या आसपास सॉल्ट लेक सेक्टर V आणि हावडा मैदान दरम्यानच्या संपूर्ण पूर्व-पश्चिम मार्गावर व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्याचे आहे.
10- अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाण्याखालील मेट्रोमध्ये लोकांना 5G इंटरनेट सुविधाही मिळणार आहे. बोगद्यात पाण्याचा थेंबही जाऊ शकत नाही, असेही सांगण्यात आले आहे.
'कोलकाता मेट्रोचे काम अनेक टप्प्यात सुरू'
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, कोलकाता मेट्रोचे काम 1970 च्या दशकात सुरू झाले होते, परंतु मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षात झालेली प्रगती मागील 40 वर्षांपेक्षा खूप जास्त आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांचे लक्ष पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि देशाचा पाया रचण्यावर आहे, जे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र असेल. कोलकाता मेट्रोचे काम अनेक टप्प्यांत पुढे गेले. सध्याच्या टप्प्यात शहरातील पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरसाठी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.